घरमनोरंजनIFFLA: दिग्दर्शक अनुराग कश्यप घेणार मराठमोळ्या फिल्ममेकर अक्षय इंडीकरची मुलाखत

IFFLA: दिग्दर्शक अनुराग कश्यप घेणार मराठमोळ्या फिल्ममेकर अक्षय इंडीकरची मुलाखत

Subscribe

अक्षय हा मूळचा सोलापूरचा त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवताच आंतराष्ट्रीय स्तरावर आपले नाव गाजवले

मराठमोळ्या फिल्ममेकर अक्षय इंडीकरची मुलाखत अनुराग कश्यप घेणार असल्याने अक्षयचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अक्षय ने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वर एक भली मोठी पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला आहे. अक्षय हा मूळचा सोलापूरचा त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवताच आंतराष्ट्रीय स्तरावर आपले नाव गाजवले. प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या पुस्तकावर आधारित ‘उदाहरणार्थ नेमाडे’ ही डॉक्यु-फिक्शन फिल्म पासून अक्षयने आपल्या कारकिर्दीची सुरवात केली. आपल्या आगल्या वेगळ्या शैलीमुळे अक्षय प्रगतिच्या शिखरावर आपले नाव कमवू लागला. आशिया खंडाचा मोठा अकादमी अवॉर्ड ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कारावर त्याने आपल नाव कोरलं आहे.

- Advertisement -

इतकेच नाही तर केरळ मधील आंतराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवात अक्षयच्या चित्रपटाला  सर्वोत्कृष्ट आशियाई आणि बेस्ट भारतीय दिग्दर्शक असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या ६७ व्या आंतराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवामधे ‘त्रिज्या’ सिनेमाने ‘बेस्ट साऊंड डिजाईन’ हा पुरस्कार पटकावला आहे.

- Advertisement -

दिग्दर्शक अनुराग कश्यपने याधीही अक्षयच्या चित्रपटाची खूपदा प्रशंसा केली आहे. त्याने चक्क अक्षयला फोन करून त्याचा चित्रपट पाहण्यासाठी येऊ शकतो का असे विचारले होते. यानंतर अक्षयने अनुराग कश्यप सोबतचा अनुभव एका भावनिक पोस्टद्वारे शेअर केला होता.


हे हि वाचा – ‘नॅशनल क्रश’ रश्मिका होणार McDonalds इंडियाची ब्रॅण्ड एम्बेसेडर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -