Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'इंडियन आयडॉल १२'च्या मंचावर साजरी होणार इफ्तारी

‘इंडियन आयडॉल १२’च्या मंचावर साजरी होणार इफ्तारी

आपल्यासाठी मंचावर इफ्तारीची व्यवस्था पाहून दानिश भारावून गेला. मागाहून सर्व परीक्षक आणि स्पर्धक यांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला.

Related Story

- Advertisement -

लोकप्रिय कार्यक्रम इंडियन आयडॉल मधील सर्वच स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. या आठवड्याच्याशेवटी सगळ्या गुणी स्पर्धकांचे अकल्पनीय परफॉर्मन्स या मंचावर असणार आहेत. आपला लाडका आणि मजेशीर होस्ट आदित्य नारायण आपल्या गंमती जमती घेऊन परतणार आहे. महान संगीतकार अन्नू मलिक आणि गीतकार मनोज मुंतशिर यांना पाहुणे परीक्षक म्हणून येणार आहेत. या वीकएंडमधल्या अप्रतिम परफॉर्मन्सेससह हा शो प्रेक्षकांना आणखी दर्जेदार मनोरंजन देणार आहे. दानिशने अय मेरी जोहराजबीं’ आणि ‘चाहुंगा मैं तुझे सांझ सवेरे’ या गाण्यांवर जबरदस्त परफॉर्मन्स दिला. इंडियन आयडॉलमधल्या या अद्भुत आवाजाच्या स्वामीने, दानिश मोहम्मदने सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. परीक्षक आणि सगळ्या स्पर्धकांनी त्याला उभे राहून मानवंदना दिली. अन्नू मलिकने देखील त्याला चार प्रोत्साहक शब्द सांगितले व त्या नंतर त्या सगळ्यांनी एकत्र इफ्तारीचा आनंद लुटला. दानिश पहिल्यांदाच आपल्या आई-वडिलांच्या गैरहजेरीत असे करत होता.

आदित्यने दानिशला विचारले की, त्याला तिच्या कुटुंबाची आज इतकी आठवण का येत आहे, यावर दानिशने उत्तर दिले, “आमच्यासाठी रमझान हा दर वर्षी खूप खास प्रसंग असतो, पण यावेळेस मी त्यांच्यासोबत इफ्तारी करू शकत नसल्याने आज मला त्या सगळ्यांची खूप आठवण येत आहे.” याला पुस्ती जोडत मनोज मुंतशिर म्हणाला, “दानिश आम्ही सगळे तुझे कुटुंबीयच आहोत आणि आज या प्रसंगी तुझ्यासाठी एक सर्प्राइज आहे.” त्यानंतर आपल्यासाठी मंचावर इफ्तारीची व्यवस्था पाहून दानिश भारावून गेला. मागाहून सर्व परीक्षक आणि स्पर्धक यांनी एकत्र भोजनाचा आस्वाद घेतला.

- Advertisement -

सगळ्यांचे हे वर्तन बघून दानिश भावुक झाला, त्यावर अन्नू मलिक म्हणाला, “दानिश तू म्हणजे हिरा आहेस. तू मंचावर अद्भुत परफॉर्म केलेस. आम्ही सगळे तुझे कुटुंबीयच आहोत आणि या प्रसंगी मी माझ्याकडून तुला भरभरून आशीर्वाद देतो आणि अल्ला तुला जीवनात यश देवो अशी कामना करतो.”


- Advertisement -

हे वाचा-   विजय आंदळकर पुन्हा अडकणार लग्न बंधनात, रिल लाईफमधील बायकोसोबतच उरकला साखरपुडा

- Advertisement -