Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनIIFA Awards 2025 : आलिया- कॅटरिनाला मागे टाकून नितांशीने पटकावला IIFA अवॉर्ड

IIFA Awards 2025 : आलिया- कॅटरिनाला मागे टाकून नितांशीने पटकावला IIFA अवॉर्ड

Subscribe

बॉलिवूडचा सर्वात महत्वाचा मानला जाणारा IIFA अवॉर्ड यंदा जयपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. अगदी शाहरुख खानपासून करीना कपूरपर्यंत अनेक कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्याची विशेष बाब म्हणजे, यंदा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार 17 वर्षीय अभिनेत्री नितांशी गोयलने पटकावला आहे. ते म्हणतात ना, टॅलेंटचं काही निश्चित वय नसतं. हे वाक्य नितांशीने अगदी खरं करून दाखवलं आहे. (IIFA Awards 2025 Nitanshi Goel Won Best Actress Award For Laapataa Ladies)

बॉलिवूड इंडस्ट्रीत आलिया भट्ट, कॅटरिना कैफ, क्रिती सॅनॉनसारख्या अभिनेत्री आघाडीवर असताना ‘लापता लेडीज’ फेम नितांशी गोयलने IIFA मध्ये बाजी मारली. वयाच्या 17 व्या वर्षी नितांशीने IIFA सारखा मोठा पुरस्कार जिंकून कारकिर्दीतील मोठा टप्पा गाठलाय. सोशल मीडियावर तिचे चाहते आनंद व्यक्त करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. माहितीनुसार, ‘लापता लेडीज’ या सिनेमातील भूमिकेसाठी तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. किरण राव दिग्दर्शित या सिनेमाच्या कथानकाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले होते. सिनेमात नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव आणि प्रतिभा रांटा मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

यंदा IIFA अवॉर्ड सोहळ्यात ‘लापता लेडीज’ या सिनेमाने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. ज्यात संगीत, एडिटिंग, दिग्दर्शन अशा विविध १० श्रेणीत या सिनेमाने पुरस्कार जिंकले आहेत. अभिनेत्री नितांशी गोयलबाबत अधिक माहिती द्यायची झाली तर, रुपेरी पडद्यावर काम करण्याआधी तिने अनेक मालिका तसेच सिरीजमध्ये काम केले आहे. ज्यांच्या माध्यमातून ती प्रकाशझोतात आली मात्र, ‘फूल कुमारी’ या पात्रामुळे तिला खरी ओळख मिळाली. ‘थपकी प्यार की’, ‘पेशवा बाजीराव’ आणि ‘इनसाइड एज 2’सारख्या दर्जेदार कलाकृतींमध्येही तिनेही काम केले आहे.

हेही पहा –

Sairat Movie : आर्ची- परश्याचा कमबॅक, थिएटरमध्ये पुन्हा रिलीज होणार सैराट