घरमनोरंजनइलियाना डिक्रूज रुग्णालयात दाखल! फोटो शेअर करत दिली माहिती

इलियाना डिक्रूज रुग्णालयात दाखल! फोटो शेअर करत दिली माहिती

Subscribe

बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. इलियाना डिक्रूजने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन रुग्णालयातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इलियानाची प्रकृती ठिक नसल्याचे पाहून तिचे चाहते ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करु लागले आहेत.

इलियाना डिक्रूजने शेअर केले फोटो

- Advertisement -

इलियाना डिक्रूज सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच तिने तिचे रुग्णालयातील बेडवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये इलियानाच्या हाताला सलाईन लावली आहे. इलियानाला 3 बॅग IV fluid चढवल्या आहेत.

- Advertisement -

इलियाना डिक्रूजने दुसऱ्या फोटोखाली लिहिलंय की, “एक दिवस किती बदल आणतो. काही चांगले डॉक्टर आणि 3 बॅग IV fluid.” तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने लिहिलंय की, “जे माझ्या प्रकृतीबाबत चौकशी करण्यासाठी मॅसेज करत आहेत. त्या सर्वांना धन्यवाद. तुम्ही माझी काळजी करता त्याबद्दल आभार, मी सध्या ठिक आहे. मला वेळेवर उपचार मिळाले.”

दरम्यान, इलियाना डिक्रूजने टॉलिवूडसोबतच बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने वयाच्या 19 व्या वर्षापासून मॉडलिंग करायला सुरुवात केली होती.’देवासु’ या चित्रपटातून इलियाना डिक्रूजने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. इलियानाने ‘बर्फी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामुळे तिला प्रसिद्धी मिळाली.


हेही वाचा :

स्टाईलचा Swag, Attitude चा वाघ ‘टर्री’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -