घर मनोरंजन इलियाना डिक्रूझ प्रेग्नेंसीत घेतेय ड्राइव्हचा आनंद; बेबी बंपसोबत व्हिडीओ केला शेअर

इलियाना डिक्रूझ प्रेग्नेंसीत घेतेय ड्राइव्हचा आनंद; बेबी बंपसोबत व्हिडीओ केला शेअर

Subscribe

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. इलियाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यातील नवनवीन अपडेट शेअर करत असते. दरम्यान, इलियाना डिक्रूझने नुकताच स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती तिचा बेबी बंप फ्लान्ट करताना दिसत आहे.

इलियाना डिक्रूझने केला व्हिडिओ शेअर

- Advertisement -

इलियाना डिक्रूजने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती कारमध्ये बसलेली दिसत आहे. यात इलियानाचा बेबी बंपही दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर इलियानाचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. चाहते यावर अनेत कमेंट्स देखील करत आहेत.

इलियाना डिक्रूझच्या बाळाचे बाबा कोण?

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

इलियाना डिक्रूजच्या प्रेग्नेंसीची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. कारण, इलियाना डिक्रूझने अद्याप लग्न केलेले नाही. काही वर्षांपूर्वी इलियाना डिक्रूज ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर एंड्रयू नीबोनला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि दोघांनी गुपचूप लग्न केले होते. मात्र, त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. त्याचवेळी, इलियाना डिक्रूझचे नाव कतरिना कैफचा भाऊ सेबसायन लॉरेंट मिशेलसोबतही जोडले गेले होते.

इलियाना डिक्रूझने या चित्रपटांमध्ये केले काम

- Advertisement -

इलियाना डिक्रूजने बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. इलियानाने 2006 मध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘बर्फी’, ‘रुस्तम’, ‘बादशाहो’, ‘रेड’, ‘मैं तेरा हीरो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये इलियानाने काम केले आहे.


हेही वाचा :

रिमिक्सपेक्षा मूळ गाण्यांना प्राधान्य… ‘आज फिर तुम पे’ गाण्याबाबत अनुराधा पौडवाल यांचे स्पष्टीकरण

- Advertisment -