घरमनोरंजनप्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर इलियाना डिक्रूझने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा पहिला फोटो

प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर इलियाना डिक्रूझने शेअर केला बॉयफ्रेंडसोबतचा पहिला फोटो

Subscribe

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. इलियाना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यातील नवनवीन अपडेट शेअर करत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी इलियानाने बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला होता. दरम्यान, आता इलियानाने एक व्हिडिओ आणि फोटो एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओ शेअर करत इलियानाने सांगितलं की, ती बेबीमूनसाठी रवाना झाली आहे. तर पुढच्या स्टोरीमध्ये तिने बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

इलियाना डिक्रूझ बेबीमूनसाठी रवाना

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या तिच्या प्रेग्नेंसीचा आनंद घेत आहे. यादरम्यानच्या अनेक गमतीशीर गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच इलियाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती बेबीमूनसाठी रवाना झाल्याचे तिने सांगितले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिचा आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या हात दिसत आहे.

- Advertisement -

इलियाना डिक्रूझच्या बाळाचे बाबा कोण?

इलियाना डिक्रूजच्या प्रेग्नेंसीची माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. कारण, इलियाना डिक्रूझने अद्याप लग्न केलेले नाही. काही वर्षांपूर्वी इलियाना डिक्रूज ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर एंड्रयू नीबोनला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि दोघांनी गुपचूप लग्न केले होते. मात्र, त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. त्याचवेळी, इलियाना डिक्रूझचे नाव कतरिना कैफचा भाऊ सेबसायन लॉरेंट मिशेलसोबतही जोडले गेले होते.

- Advertisement -

इलियाना डिक्रूझने या चित्रपटांमध्ये केले काम

इलियाना डिक्रूजने बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. इलियानाने 2006 मध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘बर्फी’, ‘रुस्तम’, ‘बादशाहो’, ‘रेड’, ‘मैं तेरा हीरो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये इलियानाने काम केले आहे.

 


हेही वाचा :

‘आदिपुरूष’मधील हनुमानाचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -