घर मनोरंजन इलियानाने शेअर केला मुलासोबतचा फोटो

इलियानाने शेअर केला मुलासोबतचा फोटो

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून प्रेग्नेंसीमुळे चर्चेत असणारी इलियाना डिक्रूझने 1 ऑगस्ट रोजी आपल्या मुलाला जन्म दिला. नुकत्याच काही तासांपूर्वी याबाबत इलियानाने माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केली. या पोस्टमध्ये तिने तिच्या मुलाची पहिली झलक दाखवली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा इलियानाने मुलासोबतचा आणखी फोटो सोशल मीडियावपर शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

इलियानाने शेअर केला मुलासोबतचा फोटो

- Advertisement -

इलियाना डिक्रूझने 1 ऑगस्ट रोजी आपल्या मुलाला जन्म दिला. याबाबत रविवारी तिने सोशल मीडियाद्वारे मुलाचा फोटो शेअर करत त्याच्या जन्माची घोषणा केली. शिवाय यावेळी तिने आपल्या मुलाच्या नावाची देखील घोषणा केली. इलियाना डिक्रूझने तिच्या मुलाचे नाव को फिनिक्स डेलॉन ठेवले आहे. अशातच, इलियानाने आणखी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला ज्यात इलियानाने मुलाचा हात तिच्या हातात घेतला आहे, “या फोटोवर तिने आई होऊन 1 आठवडा झाल्याचं लिहिलं आहे.”

इलियाना डिक्रूझ आधीपासूनच विवाहीत?

जेव्हा इलियाना डिक्रूझने आई होण्याची घोषणा केली होती, त्याआधी इलियानाने लग्न केलं आहे ही बातमी कधीच समोर आली नव्हती. त्यामुळे इलियाना लग्नाशिवाय तिच्या पहिल्या मुलाला जन्म देणार आहे, असं अनेकांना वाटत होतं. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, इलियानाने प्रेग्नेंसीची घोषणा करण्यापूर्वी एक महिना आधी लग्न केले होते. इलियानाने बॉयफ्रेंड मायकल डोलनसोबत13 मे रोजी लग्न केले होते.

इलियाना डिक्रूझने ‘या’ चित्रपटांमध्ये केले काम

- Advertisement -

इलियाना डिक्रूजने बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. इलियानाने 2006 मध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘बर्फी’, ‘रुस्तम’, ‘बादशाहो’, ‘रेड’, ‘मैं तेरा हीरो’ यांसारख्या चित्रपटांमध्ये इलियानाने काम केले आहे.


हेही वाचा : फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत

- Advertisment -