घरमनोरंजनUrfi Javed : "मी मेले नाही, फक्त...", उर्फी जावेदनं उडवली पूनमची खिल्ली

Urfi Javed : “मी मेले नाही, फक्त…”, उर्फी जावेदनं उडवली पूनमची खिल्ली

Subscribe

अभिनेत्री पूनम पांडे हीचे निधन झाल्याची पोस्ट व्हायरल होताच सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. पूनम पांडे हिचे 32 व्या वर्षी सर्व्हायकल कॅन्सरने निधन झाले अशी माहिती इंन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या टीमकडून शेअर करण्यात आली होती. पूनम पांडेच्या निधनानंतर बॅालिवुडच्या कलाकारांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दुख: व्यक्त केले होते.

24 तासानंतर पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती समोर आली. स्वत: पूनमने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत “मी जिवंत आहे” अशी बातमी दिली. सर्व्हायकल कॅन्सरबाबत जागरुकता पसरवण्यासाठी निधनाची बातमी दिली असं पूनमने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. या व्हिडिओमधून पूनमने लोकांची माफीही मागितली. मात्र तिच्या व्हिडिओनंतर लोक तिचा चांगलाच समाचार घेताना दिसत आहे. अशातच अभिनेत्री उर्फी जावेदनं (urfi javed) देखील पूनमचं नाव घेत तिची खिल्ली उडवली आहे.

- Advertisement -

उर्फी जावेदची इन्स्टाग्राम पोस्ट
उर्फीनं तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये उर्फी झोपेतून उठलेली दिसत आहे. या फोटोला उर्फीनं कॅप्शन दिलं. “नमस्कार मित्रांनो, मी मेले नाही, फक्त हँगओव्हरबद्दल जागकरुकता पसरवत आहे. जेव्हा तुम्ही मद्यपान करता तेव्हा तुम्हाला खूप जिवंत वाटते, दुसऱ्या दिवशी तुम्हाला मेल्यासारखे वाटते पण तुम्ही खरोखर मरत नाही. माफ करा मेलेले कधी मरत नाही”. या पोस्टवर उर्फीच्या फोटोला अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

- Advertisement -

निधनाच्या बातम्यांनतर पूनम पांडेची पोस्ट
पूनमने स्वत: तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत “मी जिवंत आहे” अशी बातमी दिली. व्हिडिओच्या सुरुवातीला पूनमने माफी मागितली, पूनम म्हणाली, “मी जिवंत आहे” सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हे सर्व केलं.
“हजारो महिलांचा सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यू होतो. कारण त्यांना माहिती नसतं की काय करायचं पण हा कॅन्सर बरा होऊ शकतो फक्त तुम्हाला काही टेस्ट करुन HPV व्हॅक्सिन घ्यायची असते. सर्व्हायकल कॅन्सरमुळे आपल्याला प्राण गमवावे लागू नये म्हणून आपल्याला हे करायला हवं. आपण एकत्र मिळून या कॅन्सरबाबत जनजागृती करुया. तुम्ही माझ्या वेबसाईटला जरुर भेट द्या. सर्व्हायकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी (http:www.poonampandeyisalive) ही वेबसाईट लॅान्च केली आहे” असं पूनम पांडेनी या व्हिडिओत सांगितले आहे.”

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -