घरमनोरंजनमला भीती वाटते... डीपनेक फेक व्हिडीओवर रश्मिकाने पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया

मला भीती वाटते… डीपनेक फेक व्हिडीओवर रश्मिकाने पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया

Subscribe

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात रश्मिकासोबत अभिनेता रणबीर कपूर देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. दरम्यान, अशातच रश्मिका एका फेक व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. मागील अनेक तासांपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर सुरुवातीला अनेकांनी रश्मिकाला ट्रोल केलं. दरम्यान, त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार या व्हिडीओमध्ये दिसत असणारी रश्मिका खरं तर रश्मिका नसून झारा पटेल नावाची एक तरुणी आहे.

या फेक व्हिडीओची खरी बाजू समोर आल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी याबद्दल खेद व्यक्त केला. अमिताभ बच्चन यांनी देखील यावर तक्रार करण्याची मागणी केली. दरम्यान, अशातच आता रश्मिकाने स्वतः या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

रश्मिकाने शेअर केली पोस्ट

रश्मिकाने पोस्ट लिहिली

फेम व्हिडीओ प्रकरणावर पोस्ट शेअर रश्मिकाने लिहिलंय की, “सोशल मीडियावर व्हायरल होत असेलेल्या माझा डीपनेक फेक व्हिडीओने मला खूप दुखावले आहे. हे शेअर करताना मला खूप वाईट वाटत आहे. खरे सांगायचे तर हा प्रकार माझ्यासाठी खूप धोक्कादायक आहे. मला भीती वाटते. पण मला हे देखील लक्षात घ्यायचं आहे की हे माझ्याबाबतीत घडलं आहे जे इतर कोणाच्याही बाबतीत घडू शकते. यामुळे खूप त्रास होतो. काही लोक तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करत आहेत.

- Advertisement -

“आज, एक महिला आणि एक अभिनेत्री म्हणून, मी माझे कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतक यांची आभारी आहे, ज्यांनी माझे संरक्षण केले आणि मला सपोर्ट केला.” असं रश्मिका म्हणाली.

रश्मिकाच्या फेक व्हिडिओमुळे अमिताभ संतापले

रश्मिका मंदान्नाचा हा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्याने अमिताभ बच्चनही संतापले. बिग बींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. मायक्रो ब्लॉगिंग साइट X (ट्विटर) वर व्हायरल व्हिडिओ शेअर करताना अमिताभ यांनी लिहिलंय की, “होय, ही कायदेशीरदृष्ट्या मजबूत केस आहे.” शिवाय त्यांनी या व्हिडीओची खरी बाजू सांगतली आहे.

 


हेही वाचा :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -