HomeमनोरंजनIMDb Top 20 Web Series : या 20 वेब सिरीजने IMDb यादीत...

IMDb Top 20 Web Series : या 20 वेब सिरीजने IMDb यादीत मिळवलंय विशेष स्थान

Subscribe

आजकाल विकेंडला थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्यापेक्षा घरबसल्या मनोरंजनाचा पर्याय निवडणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मला चांगले दिवस आले आहेत. अनेक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नवनवीन सिनेमे तसेच वेबसिरीज प्रदर्शित होत असतात. गेल्या काही काळात यातील बऱ्याच वेबसिरीज न केवळ हिट ठरल्या तर IMDb च्या लिस्टमध्ये स्थानापन्नसुद्धा झाल्या. अशाच टॉप 20 वेब सिरीजविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. (IMDb Top 20 Web Series Name List From 2021 to 2024)

IMDb ची टॉप लिस्ट

IMDb च्या माध्यमातून प्रतिवर्षी मोस्ट पॉप्युलर वेबसिरीजची टॉप 10 लिस्ट जाहीर केली जाते. यातील 2021 – 2024 दरम्यान जाहीर केलेल्या लिस्टमधील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या आणि प्रेक्षकांनी पसंत केलेल्या प्रत्येक वर्षातील 5 लोकप्रिय वेबसिरीजची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ज्या तुम्ही आवर्जून पहायला हव्या.

2024 मधील लोकप्रिय 5 वेबसिरीज

1. हीरामंडी – द डायमंड बाजार
2. मिर्जापुर 3
3. पंचायत 2
4. ग्यारह ग्यारह
5. सिटाडेल

यांपैकी हीरामंडी- द डायमंड बाजार ही सिरीज ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर तर मिर्जापुर 3 अमॅझॉन प्राईम व्हिडिओवर पाहता येईल. पंचायत 2 अमॅझॉन प्राईम व्हिडिओवर तर ग्यारह ग्यारह Zee 5 आणि सिटाडेल अमॅझॉन प्राईम व्हिडिओवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

2023 मधील लोकप्रिय 5 वेबसिरीज

1. फर्जी
2. गन्स एंड गुलाब्स
3. द नाइट मैनेजर 2
4. कोहरा
5. असुर 2

2023 मधील ‘फर्जी’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म अमॅझॉन प्राईम व्हिडीओवर तर ‘गन्स एंड गुलाब्स’ व ‘कोहरा’ नेटफ्लिक्सवर, ‘द नाईट मॅनेजर 2’ डिज्नी प्लस हॉटस्टार आणि ‘असुर 2’ जिओ सिनेमावर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

2022 मधील लोकप्रिय 5 वेबसिरीज

1. पंचायत
2. दिल्ली क्राइम
3. रॉकेट बॉयज
4. ह्यूमन
5. अपहरण

यातील ‘पंचायत’ ही सिरीज अमॅझॉन प्राईम व्हिडीओ, ‘दिल्ली क्राइम’ नेटफ्लिक्सवर, ‘रॉकेट बॉयज’ सोनी लिव्हवर, ‘ह्यूमन’ डिज्नी प्लस हॉटस्टारवर आणि ‘अपहरण’ एमएक्स प्लेयरवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.

2021 मधील लोकप्रिय 5 वेबसिरीज

1. एस्पिरेंट्स
2. ढिंडोरा
3. द फॅमिली मॅन
4. द लास्ट ओव्हर
5. सनफ्लावर

2021 मधील ‘एस्पिरेंट्स’, ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘द लास्ट ओव्हर’ या सिरीज अमॅझॉन प्राईम व्हिडिओवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. तर ‘ढिंडोरा’ यूट्यूबवर आणि ‘सनफ्लावर’ Zee5 वर उपलब्ध आहेत.

हेही पहा –

Junaid Khan : युट्यूबवर सिनेमे FREE रिलीज करा, आमीर खानच्या मुलाचे वक्तव्य चर्चेत