घरमनोरंजनबॉलिवूडमधील 'या' हॉरर चित्रपटांना IMDB चे सर्वाधिक रेटिंग

बॉलिवूडमधील ‘या’ हॉरर चित्रपटांना IMDB चे सर्वाधिक रेटिंग

Subscribe

बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. यात बायोपिक, हॉरर चित्रपट, कॉमेडी, ड्रामा, अॅक्शन, ऐतिहासिक, माइथोलॉजिकल आणि अॅडव्हेंचर यांसारखे अनेक चित्रपट आहेत. मात्र, या सर्वात वेगळा आणि रोमांचक प्रकार म्हणजे हॉरर चित्रपट या चित्रपटांची कथा आणि निर्मिती इतर चित्रपटांपेक्षा थोडी वेगळी असते. शिवाय या चित्रपटांना देखील प्रेक्षक प्रचंड प्रतिसाद देतात.

दरम्यान, IMDb च्या रेटिंगनुसार, काही हॉरर चित्रपटांची यादी तयार करण्यात आली आहे. ज्यात बॉलिवूडमधील काही चित्रपटांचा समावेश आहे. जे तुम्ही OTT वर देखील कधीही पाहू शकता.

- Advertisement -
  • तुम्बाड

राहिल अनिल बर्वे दिग्दर्शित तुम्बाड मराठी चित्रपट आहे. भयपट आणि थ्रिलरने भरलेल्या या चित्रपटाला IMDb वर सर्वाधिक 8.2 रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime वर उपलब्ध आहे.

  • रात

1992 मध्ये आलेल्या या चित्रपटाची निर्मिती राम गोपाल वर्मा यांनी केली होती. चित्रपटाची कथा एका अशा कुटुंबाभोवती फिरते ज्यांचे आयुष्य नवीन घरात शिफ्ट झाल्यावर बदलते. या चित्रपटाला IMDb वर 7.1 रेटिंग मिळाले आहे. हा चित्रपट झी 5 वर पाहता येईल.

- Advertisement -
  • बुलबुल

अन्विता दत्त गुप्तान दिग्दर्शित ‘बुलबुल’ चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात परीकथा दाखवण्यात आली होती. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. बुलबुलला IMDb वर 6.5 रेटिंग मिळाले आहे.

  • राझ

दिनो मोरिया, बिपाशा बसू आणि आशुतोष राणा यांची मुख्य भूमिका असलेल्या राझ चित्रपटाला IMDb वर 6.6 रेटिंग मिळाले आहेत. चित्रपटाची कथा आदित्य आणि संजना या विवाहित जोडप्याभोवती फिरते. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

  • परी

अनुष्का शर्माचा ‘परी’ चित्रपट तुम्ही Amazon Prime Video वर पाहू शकता. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला IMBD वर 6.6 रेटिंग मिळाले आहे. या चित्रपटात अनुष्काने रुखसाना नावाच्या मुलीची भूमिका केली आहे जिच्याकडे अलौकिक शक्ती आहे आणि ती एका माणसाच्या प्रेमात पडते.


हेही वाचा :

अभिनेत्री आर्याच्या आईने 47व्या वर्षी दिला बाळाला जन्म, 23 वर्ष लहान बहिणीचे फोटो केले शेअर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -