#JNU Attacke: दीपिकाच्या जाहीरातींमध्ये घट

Deepika Padukone reaches JNU to show solidarity with students. See pics, videos
JNU Attacke: दीपिका पदुकोण, कन्हैया कुमार जेएनयूत पोहोचले

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. दीपिका जाहिराती आणि सिनेमांसाठी सर्वाधिक मानधन घेते. सध्या ब्रिटानीयाची गुड डे, लॉरियल,तनिष्क अशा काही ब्रॅण्डसह २३ जाहीरातींमध्ये दीपिका दिसते. पण गेल्या काही दिवसांपासून टिव्हीवरून दीपिकाच्या जाहीराती गायब आहेत. दीपिकाने जेएनयूत जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यांनतर या जाहीरात कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता हा वाद मिटेपर्यंत या जाहीराती दाखवल्या जाणार नाहीयेत.

जाहीरात कंपन्यांनी दीपिकाच्या जाहीराती बंद केल्याचा फटका जाहीरातदार आणि दीपिकाला बसणार आहे. दीपिका असलेल्या जाहिराती कमी प्रमाणात दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर कोका कोला आणि अॅमेझॉनचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या आयपीजी मीडिया ब्रँड्सचे मुख्य कार्यकारी शशी सिन्हा म्हणाल्या, ‘जाहिरातीच्या करारपत्रात एक क्लॉज असणे गरजेचे आहे. कोणताही ब्रॅण्ड जोखीम पत्करत नाही. कोणत्याही वादापासून दूर राहण्याचा ब्रँडचा प्रयत्न असतो.’

तर क्रॉसओवर एंटरटेनमेंटच्या एमडी यांनी मात्र काहीसे वेगळे मत मांडले. त्या म्हणाल्या सध्याच्या वादामुळे ब्रँड्स कधीच माघार घेणार नाहीत. दीपिकाला ज्या बद्दल विश्वास वाटतो, त्यांच्यामागे ती उभी असते. प्रत्येक कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. असे त्यांनी सांगितले.

सध्या दीपिका २३ ब्रॅण्डच्या जाहिराती करते. या जाहिरातीतून दीपिकाला केवळ १०३ कोटी एवढी रक्कम मिळते. तर दीपिका एका सिनेमासाठी दहा कोटी रूपये घेते. तर जाहीरातींसाठी ८ कोटी रूपये घेत असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

मुंबईत कार्टर रोड येथे जेएनयू हल्लाविरोधात निषेध केला. दिग्दर्शक विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप, जोया अख्यत, तापसी पन्नू आणि रिचा चड्ढा या बॉलिवूडच्या सेलिब्रिटी देखील या हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त केला. तर दीपिकाने दिल्लीत येथे जेएनयूत जाऊन या हल्ल्याचा निषेध केला. मात्र यानंतर तीच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. यामुळे अनेकांनी छपाक चित्रपट बघणार नाही असा पवित्रा घेतला. यावेळी ट्विटरवर #BanChapak,#BanDeepika Padukon हे हॅशटॅग ट्रेण्डींग होते.