लग्नाला पवित्र बंधन मानले जाते. हिंदू धर्मात लग्नाला 16 संस्कारांमधील एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. लग्नामुळे दोन कुटुंब एकत्र येतात. आता नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. प्रत्येकवर्षी प्रमाणे या वर्षीदेखील मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार विवाह बंधनात अडकले.
शिबानी-फरहान
शिबानी दांडेकर आणि अभिनेता फरहान अख्तर यांचं लग्न 17 फेब्रुवारी रोजी झालं. शिबानीसोबत फरहान अख्तरचे हे दुसरे लग्न आहे. पहिल्या लग्नातून त्याने घटस्फोट घेतला होता.
आलिया-रणबीर
लग्नापूर्वी एकमेकांना 5 वर्ष डेट केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं लग्न 14 एप्रिल 2022 रोजी रणबीरच्या राहत्या घरी नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडले. दरम्यान, आलियाने 6 नोव्हेंबर 2022 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
नयनतारा-विग्नेश
टॉलिवूड अभिनेत्री नयनतारा आणि चित्रपट निर्माता विग्नेश 2015 पासून एकमेकांना डेट करत होते. 9 जून 2022 रोजी दोघे विवाह बंधनात अडकले. शिवाय काही महिन्यांपूर्वीच सरोगसी द्वारे नयनतारा आणि विग्नेशच्या दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला आहे.
मौनी रॉय-सूरज नाम्बियार
‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे चर्चेत आलेली मौनी रॉयने 27 जानेवारी रोजी सूरज नाम्बियारसोबत लग्न केले. यांचे लग्न गोव्यामध्ये पार पडले होते.
हंसिका मोटवानी-सोहेल
अभिनेत्री हंसिका मोटवानीचं 4 डिसेंबर रोजी व्यवसायिक सोहेल कथुरियासोबत जयपूर येथे लग्न पार पडलं.
शिवानी रांगोळे-विराजस कुलकर्णी
मराठी मालिकासृष्टीतील अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांचं लग्न 3 मे रोजी पार पडलं. लग्नापूर्वा बऱ्याच वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत होते.
ऋता दुर्गुळे- प्रतिक शाह
मराठमोळी अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत 18 मे रोजी लग्नबंधनात अडकली.
अक्षया देवधर-हार्दिक जोशी
नुकत्याच काही दिवसांपूर्वी मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी झाली. 2 डिसेंबर रोजी अक्षया आणि हार्दिक विवाह बंधनात अडकले. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित अक्षया-हार्दिक यांचा पुण्यामध्ये शाही विवाह सोहळा पार पडला होता.