घरमनोरंजन2023 मध्ये बॉलिवूडचे 'हे' चित्रपट होणार प्रदर्शित

2023 मध्ये बॉलिवूडचे ‘हे’ चित्रपट होणार प्रदर्शित

Subscribe

बॉलिवूड चित्रपटांसाठी 2022 फारसे चांगले गेले नाही. 2022 मधील 3-4 मोजके चित्रपट सोडल्यास सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. अनेक चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील करण्यात आली. दरम्यान, आता काही दिवसांत नवेर्ष सुरु होईल. 2023 मध्ये देखील बॉलिवूडमध्ये बरेच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यामध्ये शाहरुखच्या ‘पठाण’ पासून ते सलमानच्या ‘टायगर 3’ पर्यंत अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

2023 मध्ये होणार ‘हे’ चित्रपट प्रदर्शित

- Advertisement -
  • पठाण
    25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.
  • शहजादा
    अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कृती सेनन यांचा ‘शहजादा’ हा चित्रपट देखील नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
  • भोला
    बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ हा चित्रपट देखील या वर्षात रिलीज होणार आहे. ‘भोला’ हा चित्रपट ‘कैथी’ या साऊथ चित्रपटाचा रिमेक असून 20 मार्च 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
  • रॉकी और रानी की प्रेमकहानी
    अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंह यांचा ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आजमी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
  • टायगर 3
    दिग्दर्शक मनीष शर्मांचा ‘टायगर 3’ चित्रपट 2023 मध्ये रिलीज होणार असून या चित्रपटात सलमान सोबत अभिनेता इमरान हाशमी सुद्धा दिसणार आहे. तसेच कतरिना सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदा या चित्रपटात दिसणार आहे.
  • आदिपुरुष
    ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.
  • डंकी
    शाहरुखच्या या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री तापसी पन्नू देखील मुख्य भूमिकेत दिसेल. हा राजकुमार हिरानीचा चित्रपट आहे. एप्रिलमध्ये या चित्रपटाची घोषणा झाली होती. हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 ला रिलीज होणार आहे.
  • जवान
    शाहरुख खान याचा ‘जवान’ हा चित्रपट 2 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री नयनतारा, विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
  • सॅम बहादूर
    अभिनेता विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक असून, यात विकी कौशल मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
  • बडे मियाँ छोटे मियाँ
    टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट देखील नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नसली, तरी हा चित्रपट ख्रिसमसच्या निमित्ताने रिलीज करण्यात येणार आहे.

 


हेही वाचा :

भारताच्या सरगम कौशलने पटकावला ‘मिसेस वर्ल्ड 2022’ चा किताब

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -