2023 मध्ये prabhasचा ‘सालार’ आणि Allu Arjunचा ‘पुष्पा 2’ देणार एकमेकांना तगडी टक्कर

टॉलिवूडचा सुपरस्टार प्रभास आणि अभिनेता अल्लू अर्जुनचे जगभरात अनेक चाहते आहेत. अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमवला, शिवाय या चित्रपटाने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली. आता प्रेक्षक पुष्पाच्या दुसऱ्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत असतानाच अभिनेता प्रभासच्या सालार या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार प्रभासचा ‘सालार’ आणि अल्लू अर्जुनचा सालार चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देऊ शकतात.

‘सालार’ आणि ‘पुष्पा २’ एकमेकांना भिडणार?
सूत्रांच्या मते, ‘केजीएफ २’ च्या मोठ्या यशानंतर आता ‘पुष्पा २’ चे दिग्दर्शक सुकुमार त्यांच्या चित्रपटामध्ये बरेच बदल करत आहेत. तसेच काही स्क्रिप्ट सुद्धा दुसऱ्यांदा बदलण्यात आले आहेत. ज्यामुळे ‘पुष्पा २’ रिलीज होण्यास थोडा उशीर  होईल असे सांगण्यात आले आहे. मात्र तूर्तास या चित्रपटाच्या दुसऱ्या पार्टचे शूटिंग सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे हा चित्रपट मे २०२२ ऐवजी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.

२०२३ च्या मे महिन्यात रिलीज होणार सालार?
सुपरस्टार प्रभास आणि अभिनेत्री श्रुती हासनचा ‘सालार’ चित्रपट मे २०२३ पर्यंत रिलीज होणार असल्याची शक्यता सांगितली जात आहे. त्यामुळे मे २०२३ हे दोन्ही चित्रपट रिलीज झाल्यास एकमेकांना बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर देऊ शकतात.

 


हेही वाचा :http://Karan V Grover अडकला विवाह बंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करताच चाहत्यांना बसला धक्का!