घरमनोरंजन2023 मध्ये 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटातून रणबीर आणि श्रद्धाची जोडी येणार...

2023 मध्ये ‘तू झूठी मैं मक्कार’ चित्रपटातून रणबीर आणि श्रद्धाची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

लव रंजन दिग्दर्शित ‘तू झूठी मैं मक्कार’ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. तसेच, चित्रपटाच्या अनोख्या टायटलने दर्शकांना आकर्षित केले असून, नव्या वर्षात म्हणजेच २०२३ मध्ये या चित्रपटामार्फत नवीन ऑन-स्क्रीन जोडी दर्शकांच्या भेटीला येणार आहे. ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर पह्लीयांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. अशातच, एपिक प्रेमकथा आणि रोमान्सने भरपूर असलेल्या या चित्रपटाच्या रिलीजसाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटातून अनोख्या प्रेमकथेसह रणबीर आणि श्रद्धा दर्शकांचे मनोरंजन करतील. तसेच, दोन्ही कलाकारांनी पहिल्यांदाच या सिनेमासाठी लव रंजनसोबत काम केले असून, लव रंजनचा सिग्नेचर कॉमेडी ब्रँड आणि आयकॉनिक डायलॉग्सने नेहमीच सोशल मीडिया वर ट्रेंड केले आहेत. अशातच, रणबीर आणि श्रद्धाला एकत्र पाहण्यासाठी दर्शकांची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे.

- Advertisement -

लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे. तसेच, टी-सिरीजचे गुलशन कुमार आणि भूषण कुमारद्वारा प्रस्तुत हा चित्रपट, 8 मार्च 2023 रोजी होळीच्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

प्रार्थना..! ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट चर्चेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -