घरमनोरंजनअजय देवगणची माकडीणीसोबत 'टोटल धमाल'

अजय देवगणची माकडीणीसोबत ‘टोटल धमाल’

Subscribe

अजय देवगणच्या खांद्यावर बसलेली माकडीण हॉलीवूड स्टार असून, 'टोटल धमाल' चित्रपटातून ती आपला बॉलीवूड डेब्यू करत आहे.

बॉलीवूडचा सिंघम अशी ओळख बनलेल्या अभिनेता अजय देवगणचा एका नवीन फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होतो आहे. या फोटोमध्ये अजय देवगणने एका माकडाला आपल्या खांद्यावर बसवलं असून, अजय आणि त्या माकडाची स्वारी ऐटीत कुठेतरी निघाली आहे. हे धमाल पोस्टर आहे अजय देवगणच्या ‘टोटल धमाल’ या आगामी चित्रपटाचं. ‘रेड’ चित्रपटानंतर अजय पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी तयार आहे. ‘टोटल धमाल’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असून, सध्या त्याचं हे पोस्टरंच चर्चेचा विषय ठरतं आहे. अजय देवगण आणि त्याच्या खांद्यावर एक अवली माकड असं चित्र असलेल्या या पोस्टरमधून ‘टोटल धमाल’चा फर्स्ट लूक जाहीर करण्यात आला आहे. पोस्टरवर अजयचा ‘नेव्हर सीन बिफोर’ अर्थात आधी कधीही न पाहिलेला असा आगळावेगळा लूक पाहायला मिळतो आहे. ‘टोटल धमाल’च्या या पोस्टरवरुन चाहत्यांमध्ये चित्रपटातील अजयच्या कॅरेक्टरविषयीची आणि चित्रपटाच्या गोष्टीविषयची उत्सुकता अधिकच वाढली असणार हे नक्की. या चित्रपटात हॉलीवूडची एक स्टार झळकणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

 

View this post on Instagram

 

Say Hi to Hollywood’s head turner Crystal, debuting soon in Bollywood in #TotalDhamaal. Trailer out soon!

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn) on

हॉलीवूडची ‘ही’ स्टार झळकणार…

‘टोटल धमाल’ चित्रपटात अजयसोबत झळकणारी ती हॉलीवूड स्टार दुसरी तिसरी कुणी नसून, त्याच्या खांद्यावर बसलेली माकडीण आहे. एनिमल क्रिस्टल असं या माकडीणीचं नाव असून ती हॉलवूडची स्टार आहे. एका इंग्रजी वेबसाईटच्या माहितीनुसार, क्रिस्टलने आतापर्यंत काही टी.व्ही.शोजमध्ये काम केलं आहे. तसंच तिने ‘हँगओव्हर-२’, ‘जॉर्ज ऑफ द जंगल’ आणि ‘नाईट अॅट द म्यूझिअम’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे ‘टोटल धमाल’ हा क्रिस्टलचा बॉलीवूडमधील डेब्यू आहे. अजयने शेअर केलेल्या फोटोलाही त्याने ‘क्रिस्टलचा बॉलीवूड डेब्यू’ असंच कॅप्शन दिलं आहे.
येत्या २२ फेब्रुवारीला हा प्रदर्शित होणार असून, यामध्ये अजय देवगण, माधुरी दिक्षीत, अनिल कपूर, रितेश देशमुख, अरशद वारसी, जावेद जाफरी आणि संजय मिश्रा अशा दमदार कलाकारांची फळी आहे. चित्रपाटाच्या नावाप्रमाणे आणि या पोस्टरप्रमाणे चित्रपटाची कथादेखील ‘टोटल धमाल’ असणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकाहून एक सुपरस्टार्सची गँग असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे.
‘टोटल धमाल’ चित्रपटातीस स्टारकास्ट (सौ.- इन्स्टाग्राम)

वाचा : कुंभमेळ्यात आता होणार नाही ‘राम-श्याम’ची जुदाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -