Bigg Boss OTT: शमिता शेट्टी -राकेश बापट लग्न करणार

राकेशला इतर स्पर्धकांनी शिमिता शेट्टीच्या नावाने छेडण्यास सुरूवात केली आहे.

shamita shetty mother visits bigg boss house
BB OTT: शमिता-राकेशची जोडी सुनंदा शेट्टीला आली पसंत स्पर्धक म्हणाले, सासूबाई तयार आहेत...

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रियालिटी शो ‘बिग बॉस’ (Bigg Boss) यंदा काही आठवडे वूट (Voot) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. ओटीटीवरील बिग बॉसचा 15 (Bigg Boss OTT 15) वा सिझन दिग्दर्शक करण जोहर होस्ट करत असून यंदाचा सिझन काही हटके आणि जास्त बोल्ड असणार आहे अशी चर्चा आता सोशल मीडियावर रंगत आहे. बिग बॉसमध्ये होणारे वाद विवाद कट-कारस्थान तसेच प्रेमी जोडप्यांची रंजक कहाणी या सर्वांच्या चर्चा बिग बॉसच्या घराबाहेर तुफान व्हायरल होत असतात. अशातच आता बिग बॉस ओटीटीमध्ये एक लवस्टोरी फुलत असल्याचे दिसत आहे. बिग बॉसमधील स्पर्धक राकेश बापटचे (Rakesh Bapat)नाव अभिनेत्री शमिता शेट्टी(Shamita Shetty) सोबत जोडण्यास सुरूवात केली आहे. दोघांमध्ये काही तरी शिजत आहे अशी चर्चा आता घरातील सदस्यांमध्ये देखील रंगत आहे. राकेशला इतर स्पर्धकांनी शिमिता शेट्टीच्या नावाने छेडण्यास सुरूवात केली आहे. (Rakesh Bapat and Shamita Shetty)

नेमकं काय घडलं-

बिग बॉसमधील स्पर्धक दिव्या अग्रवाल सर्वांना सांगतेय की काल रात्री राकेशचे स्वप्न तुटले. तसेच निशांत राकेशला विचारतो की त्याने ऐकले आहे की तो कुठेतरी झोपायचे प्लॅनिंग करत आहे, पण त्याला इतर कुठेतरी झोपावे लागेल. यानंतर रिद्धीमा येते व राकेशला चिडवते बोलते की तो शमिताच्या बेडवर जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण मुस्कान जटानामुळे त्याच्या प्लॅन फिसकटतो. पुढे दिव्या म्हणते जर कोणी लग्न करण्याच्या मूडमध्ये आहे तर त्या स्पर्धकाने बिग बॉसच्या घरातच लग्न करायला हवे, कारण त्यांच्याकडे सध्या चांगले कपडे देखील आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

तसेच दिव्या गेल्या अनेक सिझनचे उदाहरण देते. रिद्धीमा आणि दिव्याचे एकमत होते आणि यानंतर कुटुबांतील सर्व सदस्य राकेशला शमिताच्या नावाने चिडवू लागता. यावर राकेश रिद्धिमाची स्तुती करतो. पुढे दिव्या मजा-मस्करीने राकेशला धमकी देते की हे सगळं ती शमिताला जाऊन सांगेल. यावर रिद्धीमा दिव्याला बोलते की शमिता काळजी नको करूस ती त्याची मेहूणी आहे.


हे हि वाचा – BiggBoss15:लवकरच टेलिव्हिजनवर दाखल होतोय बिग बॉस 15