इजिप्तमध्येही किंग खानचा बोलबाला; ‘Shah Rukh Khan’ मुळे मराठमोळ्या महिलेला झाला असा फायदा

शाहरुख खानचे चाहते जगभर असल्याचे उदाहरण पाहायला मिळत आहेत. या उदाहरणाची चर्चा सोशलमिडियावर मोठ्या प्रमाणात आहे.शाहरुख खानमुळे एका मराठमोळ्या महिलेला इजिप्तमध्ये फायदा झाला आहे.

In Egypt Shah Rukh Khan benefited the maharashtrian woman
इजिप्तमध्येही किंग खानचा बोलबाला; 'Shah Rukh Khan' मुळे मराठमोळ्या महिलेला झाला असा फायदा

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. मात्र, सध्या तो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.’एसआरके’चा चाहतावर्ग बराच मोठा आहे.शाहरुखचे चाहत्यांचे अनोखे किस्से हे नेहमीच  चर्चेत असतात. शाहरुख खानचे चाहते जगभर असल्याचे उदाहरण पाहायला मिळत आहेत. या उदाहरणाची चर्चा सोशलमिडियावर मोठ्या प्रमाणात आहे.शाहरुख खानमुळे एका मराठमोळ्या महिलेला इजिप्तमध्ये फायदा झाला आहे.या महिलेने झाला प्रकार ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.इजिप्तमधील ही महिला मराठमोळी असून,या महिलेचे नाव ‘अश्विनी देशपांडे’ असे आहे.

मला इजिप्तमधील एका ट्रॅव्हल एजंटला पैसे ट्रान्सफर करायचे होते,मात्र हे पैसे ट्रान्सफर करताना अनेक समस्या येत असून, काही केल्या त्या एजंटला पैसे ट्रान्सफर होत नव्हते.त्यावर तो एजंट म्हणाला,तू शाहरुख खानच्या देशात राहणारी आहेस. त्यामुळे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.मी तुझे बुकिंग करतो,तू मला नंतर पैसे दिले तरी चालेल.मी सहसा अशी मदत कोणाला करत नाही,पण किंग खानने आमच्यासाठी जे काही केले आहे त्यामुळे शाहरुखसाठी आम्हीसुद्धा काहीही करु शकतो, अशा आशयाचे ट्विट करत या महिलेने संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.या मराठमोळ्या महिलेने केलेले ट्विट सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. अनेक चाहत्यांनी हे ट्विट् रिट्विट करत सोशल मिडियावर कौतुक केले आहे.

किंग खानचे चित्रपटसृष्टीत होणार पुनरागमन

शाहरुख खानने 2018 मधील ‘झिरो’ सिनेमानंतर त्याने चित्रपटसृष्टीत ब्रेक घेतला आहे. शाहरुख खान आता ‘पठाण’ या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.


हेही वाचा – Mumbai Bank election: मुंबईकरांनी कुठल्याही गोष्टीला न भुलता सहकार पॅनलला यश दिलं, प्रवीण दरेकरांचे वक्तव्य