Tuesday, April 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत 'हा' अभिनेता साकारणार छत्रपतींची भूमिका

‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत ‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपतींची भूमिका

'स्टार प्रवाह वाहिनी' आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित नवी मालिका घेवून येणार आहे.

Related Story

- Advertisement -

‘स्टार प्रवाह वाहिनी’ आता लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित नवी मालिका घेवून येणार आहे. ‘जय भवानी जय शिवाजी’ असे या मालिकेचे नाव आहे. अभिनेता भूषण प्रधान या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. भूषण अनेक वर्षांनंतर टेलिव्हिजनवर कमबॅक करणार आहे. तर यावेळी तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. भूषणने त्याच्या या आगामी मालिकेबाबत सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. नुकचाच ‘स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा’ पार पडला, या सोहळ्यात भूषणने छत्रपती शिवाजी महाराजांवरील एक परफॉर्मन्स सादर केला होता. त्यानंतर त्याने या नव्या मालिकेविषयी व त्याच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांना सांगितले होते.

- Advertisement -

भूषण छोट्या पडद्यावर मराठा योद्धा साकारण्यासाठी फारच उत्सुक आहे.

 मालिकेविषयी सांगताना भूषण म्हणाला की, हा संपूर्ण प्रवास फार मोहक होता. मला तास् न् तास मेकअप आणि कॉस्टूमसाठी बसावे लागते, आणि त्यानंतर इतिहासातील महान योद्ध्याच्या रुपात मी परावर्तीत होतो. विशेष म्हणजे आम्ही तयारी फार आधीपासून सुरु केली होती. आम्ही फक्त शेवटी स्क्रिप्ट वाचली नाहीतर, सगळी तयारी सुरुवातीपासूनच केली होती. सगळं काही भव्य दिव्य आहे. शुटिंगचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप सुंदर आहे”. अशा शब्दाच भूषणने या मालिकेविषयीचा त्याचा उत्साह व्यक्त केला. यामुळे प्रेक्षकही भूषणला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.


- Advertisement -

हे वाचा-  ही तर फक्त सुरुवात…देशमुखांच्या राजीनाम्यावर कंगनाचं खोचक ट्वीट

- Advertisement -