‘Kabhi Eid Kabhi Diwali’ मध्ये Shehnaaz Gill करणार ‘या’ अभिनेत्या सोबत रोमांस

सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘कभी ई़द कभी दिवाली’ येत्या काळात प्रर्दशित होणार असून गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाच्या स्टार कास्टबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. मागे या चित्रपटातील काही अभिनेते चित्रपटातून बाहेर पडले तर काही नवनवीन अभिनेत्यांची चित्रपटात एन्ट्री सुद्धा झाली. आता नुकत्याच एका माहितीनुसार या चित्रपटातून बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शहनाज गिलची बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘कभी ई़द कभी दिवाली’मध्ये शहनाज गिल पंजाबी अभिनेता आणि गायक जस्सी गिल सोबत रोमांस करताना दिसणार आहे.

शहनाज गिलसोबत जस्सी गिल करणार रोमांस

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्री शहनाज गिल पंजाबी अभिनेता जस्सी गिल सोबत ‘कभी ई़द कभी दिवाली’मध्ये रोमांस करताना दिसणार आहे. या चित्रपटात शहनाज गिल महत्त्वाची भूमिका साकारणार असून यापूर्वी शहनाज गिल आयुष शर्मासोबत रोमांस करताना दिसणार होती मात्र आयुष शर्मा या चित्रपटातून बाहेर पडल्याने शहनाज गिल जस्सी गिलसोबत दिसणार आहे.

डिसेंबर चित्रपट होणार प्रदर्शित
सूत्रांच्या मते, डांसर राघव जुयाल सुद्धा या चित्रपटामध्ये मालविका शर्मासोबत रोमांस करताना दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत असून चित्रपटाचे शूटिंग आता चालू करण्यात आले आहे. येत्या डिसेंबर महिन्यात चित्रपट रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा :‘अन्य’ चित्रपटाचा धडाकेबाज ट्रेलर लाँच