आयुष्यात पावलोपावली करावा लागतो संघर्ष… चिरंजीवीने शेअर केली समंथासाठी भावूक पोस्ट

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने नुकतीच तिच्या आजाराबाबत एक पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. समंथाच्या आजाराची बातमी कळताच तिच्या चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील कलाकारही तिला बरं वाटावं म्हणून प्रार्थना करत आहेत. दरम्यान, आता साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीने देखील समंथाच्या आजारावरील पोस्टवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

चिरंजीवीने शेअर केली समंथासाठी भावूक पोस्ट

समंथाला मायोसिटिस नावाच्या ऑटोइम्यून कंडीशनचे निदान झाले. चिरंजीवीने पोस्ट शेअर करत समंथाला लवकर ठिक होण्यास सांगितले आहे. ही पोस्ट शेअर करत चिरंजीवीने लिहिलंय की, “प्रिय सॅम, आयुष्याच्या पावलोपावली आपल्याला संघर्ष करावा लागतो. कदाचित आपल्या आंतरिक शक्तिचा तपास करण्याची परवाणगी देण्यासाठी या समस्या येतात. तुम्ही अधिक आंतरिक शक्ति असलेली एक अद्भूत स्त्री आहात. मला खात्री आहे की तुम्ही या संकटांना लवकरच पार कराल.”

चिरंजीवी व्यतिरिक्त समंथाला अभिनेता अखिल अक्किनैनीने देखील लवकर बरं होण्याची प्रार्थना केली आहे. अखिल अक्किनैनी हा नागाचैतन्यचा सावत्र भाऊ आहे.

समंथाची पोस्ट चर्चेत

“काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाच्या ऑटोइम्यून कंडीशनचे निदान झाले. ते सुधारल्यानंतर मी ते सामायिक करण्यास उत्सुक होती. पण माझ्या अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ लागत आहे. मला हळूहळू हे लक्षात येत आहे की आपल्याला नेहमीच आपली बाजू भक्कम ठेवण्याची गरज नाही. ही अगतिकता स्वीकारणे ही अशी गोष्ट आहे ज्याचा मी अजूनही संघर्ष करीत आहे. मी लवकरच पूर्ण बरी होईन असा डॉक्टरांना विश्वास आहे. माझे चांगले आणि वाईट दिवस होते…शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या…आणि जेव्हा असे वाटते की मी त्याचा दुसरा दिवस हाताळू शकत नाही, तो क्षण कसा तरी निघून जातो. हे पण निघून जाईल”

 


हेही वाचा :

आता मराठी मालिका पण गुजरातमध्ये जाणार का? ‘माझी तुझी रेशीमगाठ’बद्दल नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया