मध्यरात्री दोन तरुणांनी केला शाहरुखच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांनी केलं गजाआड

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान मागील अनेक दिवसांपासून त्याच्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसकर करोडोंची कमाई करत अनेक रेकॉर्ड्स ब्रेक केले. जगभरातील प्रेक्षकांना या चित्रपटाची भुरळ पडली आहे. दरम्यान, सर्वकाही ठीक सुरु असताना अशातच शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यात मध्यरात्री दोन तरुणांनी भिंत तोडून आत जाण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.

दरम्यान, वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19-20 वर्षाचे दोन तरुणांना काल मध्यरात्री शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याची भिंत तोडून आत जाण्याचा प्रयत्न करत होते यावेळी तेथील सुरक्षारक्षकांनी त्यांना पकडून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं. चौकशीदरम्यान, त्यांनी पोलिसांना सांगितलं की, ते गुजरातहून शाहरुखला भेटण्यासाठी आले आहेत. ते शाहरुखचे खूप मोठे चाहते आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रयत्न केला.

मात्र, कोणतीही परवाणगी न घेता हा गैरव्यवहार केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी त्या तरुणांविरोधात 452,34 या कलमाअंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

‘पठाण’ देशभरात हाऊसफुल

25 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटाने करोडोंची कमाई केली आहे. भारतासोबतच परदेशात देखील चित्रपटाने अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. अनेकजण शाहरुख आणि दीपिकाचं कौतुक करत आहेत. दरम्यान, ‘पठाण’ चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. तसेच ‘पठाण’ 100 हून अधिक देशांमध्ये 2500 हून अधिक स्क्रीनवर रिलीज झाला होता.

 


हेही वाचा :

क्राइम थ्रिलर सीरीज ‘एक्सप्लोसिव्ह’ चा पहिला प्रयोग प्रदर्शित