घरमनोरंजन'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिके मधील 'बबीता जी' पर एपिसोड आकारते...

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिके मधील ‘बबीता जी’ पर एपिसोड आकारते एवढा चार्ज !

Subscribe

या मालिकेमध्ये 'बबीता अय्यर' हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्त ही खर्‍या आयुष्यात देखील तितकीच ग्लामरस आणि हॉट आहे.

टीआरपी च्या यादीत नेहमी आपले अव्वल स्थान कायम राखणारी मालिका म्हणजेच ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ गेल्या १३ वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांच मनोरंजन करण्याबरोबरच सामाजिक संदेश लोकांना मालिके मधून दिला जातो. मालिकेमधील पात्रांना देखील प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या मालिकेमध्ये ‘बबीता अय्यर’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्त ही खर्‍या आयुष्यात देखील तितकीच ग्लामरस आणि हॉट आहे. मुनममुन दत्त गेल्या १३ वर्षा पासून या मालिकेमध्ये काम करते. तसेच ती एका एपिसोड करिता ३० ते ५० हजार रुपये एवढी रक्कम आकारते. प्रेक्षकांद्वारे बबीता आणि जेठालाल यांच्या मधील लव अॅगलला सुद्धा खूप पसंती मिळते.


मुनमुन दत्त सोशल मीडिया वर चांगलीच अॅक्टिव असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्ट वर कमेन्ट आणि लाईक्सचा वर्षाव करतात. तसेच मुनमुन नेहमी सामाजिक मुद्द्यावर आपले मत मांडत असते.
‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मालिकेला भारतातूनच नाही तर विदेशामधून देखील पसंती मिळत आहे. या मालिकेतील प्र्तेयक पत्राने आपले विशिष्ट स्थान चाहत्यांमध्ये निर्माण केल आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाबाबत  संजय लीला भन्साली घेणार मोठा निर्णय !

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -