घरमनोरंजनराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २२ व्या भारत नाट्य महोत्सवाचे उद्‌घाटन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २२ व्या भारत नाट्य महोत्सवाचे उद्‌घाटन

Subscribe

टकांच्या माध्यमातून मनोरंजन निश्चितच व्हावे, परंतु त्यासोबतच राष्ट्रीयतेची भावना व शाश्वत मानवी मूल्ये जागविण्याचे कार्य देखील व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

साहित्य, संगीत, नाट्य व कला हे उथळ मनोरंजनाकरिता नसतात, तर  ते अभिरुचीपूर्ण आनंदाकरिता असतात. नाटकांच्या माध्यमातून मनोरंजन निश्चितच व्हावे, परंतु त्यासोबतच राष्ट्रीयतेची भावना व शाश्वत मानवी मूल्ये जागविण्याचे कार्य देखील व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले. राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्था (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा) या संस्थेने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या सहकार्याने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पाच दिवसांच्या भारत नाट्य महोत्सवाचे मुंबईत आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी राज्यपाल बोलत होते.

उदघाटन सोहळ्याला ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, निर्माते दिग्दर्शक सतीश कौशिक, ज्येष्ठ रंगकर्मी व केंद्रीय चित्रपट प्रमाण मंडळाच्या सदस्या वाणी त्रिपाठी टिक्कू, राष्ट्रीय नाट्य संस्थेचे (एनएसडी) संचालक रमेश चंद्र गौड व पु ल देशपांडे अकादमीचे संचालक संतोष रोकडे प्रामुख्याने होते. कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून अमृताची बरसात करीत असतात. महाराष्ट्राला तर रंगभूमीची महान परंपरा आहे.

- Advertisement -

नाटकांच्या माध्यमातून थोर स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या जीवनगाथा सांगितल्या गेल्यास लोकांना व युवकांना इतिहासाची माहिती होईल, तसेच राष्ट्रीय नेत्यांचे गुण आत्मसात करण्याची प्रेरणा देखील मिळेल असे राज्यपालांनी सांगितले. राष्ट्रीय नाट्य संस्थेतून अनेक प्रतिभावान कलाकार घडले आहेत. संस्थेतून यापुढे देखील प्रतिभावान कलाकार पुढे येतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

उद्घाटन समारंभानंतर लगेचच, चंद्रकांत तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित “आय एम सुभाष” या हिंदी नाटकाचा प्रयोग झाला. दिनांक १० ऑगस्ट रोजी ‘ गांधी-आंबेडकर’ या हिंदी नाटकाचा प्रयोग होणार आहे. “ऑगस्ट क्रांती”, ‘टिळक आणि आगरकर” व ‘रंग दे बसंती चोला’ या नाटकांचे देखील सादरीकरण होणार आहे असे आयोजकांनी जाहीर केले.


हेही वाचा :गडकरी रंगायतन आणि प्रबोधनकार ठाकरे येथे रंगणार संजय खापरे दिग्दर्शित ‘डोन्ट वरी हो जायेगा’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -