घरमनोरंजनआतापर्यंत 'या' बॉलिवूड कलाकारांवर केलीय आयकर विभागाने कारवाई

आतापर्यंत ‘या’ बॉलिवूड कलाकारांवर केलीय आयकर विभागाने कारवाई

Subscribe

आधी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे.

बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या घरावर आज आयकर विभागाने छापेमारी केली. फँटम फिल्मच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आली आहे. या कलाकरांनी मोठ्या प्रमाणात आयकर भरला नसल्याचा संशय आयकर विभागाला आहे. अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बेहेल,मधू मंटेना या कलाकारांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे बॉलिवूडचे आणखी काही कलाकारही आयकर विभागाच्या रडारवर येण्याची शक्यता. या आधी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. कोण आहेत ते कलाकार जाणून घ्या.

सलमान खान

- Advertisement -

२००० साली सलमान खानच्या मुंबई आणि पनवेल इथल्या प्रॉपर्टीवर इनकम टॅक्सची थाड पडली.

विजय

- Advertisement -

कुली फिल्मच्या प्रोडक्शनमध्ये ब्लॅक मनी इनव्हेस्ट केल्याप्रकरणी आयकर विभागाने विजयच्या वयक्तिक आणि ऑफिशिअल प्रॉपर्टीवर आयकर विभागाने छापेमारी केली होती.

कतरिना कैफ 

२०११ साली अभिनेत्री कतरिनाच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. मात्र त्यांच्या हाती काही लागले नव्हते अशा चर्चा आहेत.

प्रियांका चोप्रा 

२०११ मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली. त्यावेळी प्रियांकाच्या घरातून ७ करोड रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती.

राणी मुखर्जी 

अभिनेत्री राणी मुखर्जीचे नावही आयकर विभागाच्या छापेमारीत आहे. राणी मुखर्जीच्या घरातून १२ लाख रुपयांनी संपत्ती जप्त करण्यात आली होती.

माधुरी दिक्षीत

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षीत हिच्या घरावरही आयकर विभागाने छापेमारी केली होती. ब्लॅकमनी विरोधात माधुरी दिक्षीतच्या घरच्या भिंती, फर्निचर तोडले होते. असे म्हटले जाते की त्यावेळी माधुरी दिक्षीतने तिचे पैसे तिच्या मॅनेजरकडे लपवण्यासाठी दिले होते.

नागार्जुन 

साऊथ सुपरस्टार नागार्जुन याचे नावही आयकर विभागाच्या छापेमारीत आहे. नागार्जुनच्या वडिलांच्या नावे असणारे अन्नपूर्णा प्रोडक्शन हाऊसवर आयकर विभागाने छापेमारी केली होती.

सोनू सूद


काही वर्षापूर्वी अभिनेता सोनू सूदने ३० करोड रुपयांची संपत्ती खरेदी केली होती. त्यानंतर सोनू सूदवर आयकर विभागाने छापेमारी केली होती.

संजय दत्त 

अभिनेता संजय दत्त करोड रुपये किंमत असलेली घड्याळे वापरतो. त्याच्या या करोडो रुपयांच्या घडळ्यांसाठी आयकर विभागाने संजय दत्तच्या घरी छापेमारी केली होती.


हेही वाचा – ‘सायना’ चे पोस्टर रीलीज,परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -