घरमनोरंजनराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, चार कर्मचाऱ्यांनी घेतला राज विरोधात साक्ष देण्याचा निर्णय

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, चार कर्मचाऱ्यांनी घेतला राज विरोधात साक्ष देण्याचा निर्णय

Subscribe

पॉर्नोग्राफीक व्हिडिओ रॅकेट केस मध्ये समावेश असणाऱ्या राज कुंद्राच्या चार कर्मचाऱ्यांनी त्याच्या विरोधात साक्ष देणार असल्याचे कळतेय.

प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला पॉर्न फिल्म चित्रीकरण प्रकरणाबाबत पोलिसांनी ताब्यात घेतल असून त्याला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. शुक्रवारी उशिरा मुंबई क्राइम ब्रांचने राज कुंद्राच्या जुहू येथील बंगल्यावर धाड टाकली. पॉर्न व्हिडिओ प्रकरण बाहेर आल्यानंतर राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ झाली. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला तपासादरम्यान खूप महत्वाचे पुरावे सापडले आहेत. अंधेरीतील राज कुंद्रा यांच्या वियान आणि जेएल स्ट्रीम कार्यालयात एक ‘इंटेलिजेंस कपाट’ सापडल्याचे मुंबई पोलिसांनी शनिवारी सांगितले. पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण पुरावे या कपाटातून समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी गुन्हे शाखेने शुक्रवारी कोर्टाला असे सांगितले की, राज कुंद्रा लवकरच १२१ अश्लील व्हिडिओंचा ९ कोटी रुपयांवर व्यवहार करणार आहे. त्यांच्या एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील संभाषणांमधून आणि इतर ईमेलने अश्लील चित्रपटाशी संबंधित या व्यवसायाला या लोकांनी ‘प्रोजेक्ट ख्वाब’ असे नाव दिले होते.

पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पॉर्नोग्राफीक व्हिडिओ रॅकेट केस मध्ये समावेश असणाऱ्या राज कुंद्राच्या चार कर्मचाऱ्यांनी त्याच्या विरोधात साक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज कुंद्रा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. इतकंच नाही तर त्याची पत्नी शिल्पा शेट्टीला सुद्ध पोलिसांनी तपासा करीता बोलवल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर शिल्पाने पोलिसांना सांगितले माझा पती निर्दोष आहे. माझा पती राज कुंद्रा ज्या व्हिडिओसाठी काम करत होता ते व्हिडिओ एरोटिक व्हिडिओ होते. एरोटिक व्हिडिओ पॉर्न व्हिडिओ नसतात.  शिल्पाच्या या वक्तव्यानंतर या प्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हे हि वाचा- माझा पती निर्दोष आहे- शिल्पा शेट्टी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -