घरमनोरंजन'लाल सिंग चड्ढा'वर इंग्लंडचे माजी क्रिकेटर मोंटी पनेसर यांचा आक्षेप

‘लाल सिंग चड्ढा’वर इंग्लंडचे माजी क्रिकेटर मोंटी पनेसर यांचा आक्षेप

Subscribe

इंग्लंडचे माजी क्रिकेटर मोंटी पनेसरच्या मते, हा चित्रपट भारतीय सेना आणि शिखांचा अपमान करत आहे. याबाबत आपलं मत मांडत त्यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे.

आमीर खान आणि करीना कपूरचा लाल सिंह चड्ढा 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट चर्चेत होता. प्रदर्शनापूर्वी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावरून ट्रोल करत केली जात होती. आता हा चित्रपट प्रदर्शित झाला असून यावर इंग्लंडचा माजी क्रिकेटर मोंटी पनेसर याने देखील हा चित्रपट पाहून त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे.

चित्रपटामध्ये भारतीय सेना आणि शिखांचा अपमान
खरंतर, इंग्लंडचे माजी क्रिकेटर मोंटी पनेसरच्या मते, हा चित्रपट भारतीय सेना आणि शिखांचा अपमान करत आहे. याबाबत आपलं मत मांडत त्यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलंय की, हा चित्रपट भारतीय सेना आणि शिखांचा अपमान करत आहे. तसेच त्या क्रिकेटरने #BoycottLalSinghChadda हे हॅशटॅग देखील वापरलेलं आहे. मोंटी पनेसरने इंग्लंडसाठी 50 टेस्ट आणि 26 वनडे इंटरनॅशनल मॅचमध्ये 167 आणि 24 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत.

- Advertisement -

1994 मध्ये हॉलिवूड चित्रपट फॉरेस्ट गम्प प्रदर्शित झाला होता. लाल सिंह चड्ढा त्याच चित्रपटचा रिमेक आहे. खरंतर, या चित्रपटामध्ये कमी आईक्यू असलेल्या एक मुलगा अमेरिकन सेनेमध्ये भरती होतो. मोंटी पनेसर यांच्या मते, वियतनाम युद्धमध्ये गरज पूर्ण करण्यासाठी अमेरिकी सेना कमी आईक्यू असलेल्या लोकांना सेनेमध्ये भरती करून घेते. त्यामुळे हॉलिवूडमध्ये ही गोष्ट चालत होती. परंतु बॉलिवूडमध्ये या चित्रपटाला काहीही अर्थ नाही. हा चित्रपट भारतीय सेनेचा आणि शिखांचा अपमान करत आहे.

दरम्यान, भारतातही मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. आमीर खान आणि करीना कपूरने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेली आहे. साउथ अभिनेता नागा चैतन्य देखील महत्वाची भूमिका साकारली आहे.


हेही वाचा :राजू श्रीवास्तव अजूनही बेशुद्ध, प्रकृती चिंताजनक

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -