Thursday, April 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन indian idol 12: आदित्य नारायण पाठोपाठ स्पर्धक पवनदीपला कोरोनाची लागण

indian idol 12: आदित्य नारायण पाठोपाठ स्पर्धक पवनदीपला कोरोनाची लागण

Related Story

- Advertisement -

‘इंडियन आइडल १२’ या सिंगिंग रियालिटी शोला होस्ट करणारा संगीतकार आदित्य नारायणाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली. यापाठोपाठ आता शोमधील स्पर्धक पवनदीप राजनदेखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. पवनदीप सद्या क्वारांटाईन होत उपचार घेत आहे. परंतु या दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर इतर स्पर्धक आणि जजचे कोरोना टेस्ट केली जात आहे.

- Advertisement -

दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पवनदीप राजनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये आदित्यनंतर शोला होस्ट ऋत्विक धंजानी बोलताना दिसतोय. यात ऋत्विक पवनदीपला व्हिडिओ कॉल करतो. यावेळी पवन क्वारंटाइन असतानाही शोमध्ये आलेल्या खास पाहुणे दिग्गज संगीतकार आनंद-कल्याणजी यांच्यासह जज नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांचे बातचीत करतो. तसेच पाहुणे संगीतकार आनंद-कल्याणजी यांच्यासाठी स्पेशल गाणे गातो. या स्पेशल एपिसोडमधील पवनदीपचा वर्चुअल परफॉर्मेंस पाहून आनंद-कल्याणजी देखील खूश होतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pawandeep Rajan (@pawandeeprajan)

- Advertisement -

सोशल मीडियावर पवनदीपचे लाखो फॅन्स आहेत. या फॅन्सकडून पवनदीपच्या तब्येतीची विचारपूस केली जात आहे. उत्कृष्ट आवाजाच्या जोरावर आज पवनदीप संगीत क्षेत्रात आपले नाव उंचावत आहे. अनेक चाहते आज पवनदीपला पुन्हा शोमध्ये पाहण्यासाठी प्रार्थना करत आहेत. आदित्यपाठोपाठ पवनदीपही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शो सुरु करण्याआधी नेहा कक्कड, हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांची दररोज कोरोना टेस्ट केली जात आहे. तसेच शोमध्ये येणाऱ्या प्रत्येक गेस्टची कोरोना नियमांचे पालन करावे लागत आहे.


 

- Advertisement -