Indian Idol 12 Winner : पवनदीप कुमारने जिंकली ‘इंडियन आयडल १२’ ची ट्रॉफी

indian idol 12 winner pawandeep rajan to win trophy
Indian Idol 12 Winner:पवनदीप कुमारने जिंकली 'इंडियन आयडल १२' ची ट्रॉफी

हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय संगीत रिऑलिटी शो इंडिया आयडल १२ चा विजेता कोण ठरणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. नुकताच या शोचा ग्रँड फिनाले संपन्न झाला. या ग्रँड फिनालेमध्ये पवनदीप राजनने विजेते पद पटकावत ‘इंडियन आयडल १२’ ची ट्रॉफी आपल्य़ा नावे केली. तर अरुणिता कांजीलाल हीने उपविजेते पद पटकावले आहे.

पवनदीप राजन व अरुणिता हे दोघेही शोच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. यात पवनदीपला नेहमीच चाहत्यांची पसंती होती. यामुळे अधिक मताधिक्याने पवनदीपने विजेतेपदापर्यंत बाजी मारली.

पवनदीप राजनला ‘इंडियन आयडल १२’ ची चमकती ट्राफी आणि २५ लाखांचा धनादेश देऊन गौरवण्यात आले. यावेळी सिने विश्वातील अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यात जावेद अली, मनोज मुंतशीर, उदित नारायण, कुमार सानू, मिका सिंग, अल्का याग्निक अशा अनेक दिग्गजांनी धमाकेदार परफॉर्मन्स दिलेत. तसेच यापूर्वीच्या सिजनमधील स्पर्धकांनीही दमदार परफॉर्मन्स दिलेत. प्रत्येकाने अनु मलिकसोबतही परफॉर्मन्स सादर केला.