घरताज्या घडामोडी'इंडियन आयडल' फेम रेणू नागरची प्रकृती गंभीर

‘इंडियन आयडल’ फेम रेणू नागरची प्रकृती गंभीर

Subscribe

राजस्थानच्या अलवर जिल्ह्याची रहिवासी असलेली गायिका रेणू नागर हिच्या विवाहीत प्रियकराने आत्महत्या केल्यानंतर रेणू नागरची प्रकृती गंभीर झाली आहे.

राजस्थानच्या अलवर जिल्ह्याची रहिवासी असलेली गायिका रेणू नागर हिच्या विवाहीत प्रियकराने आत्महत्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारा दरम्यान, त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूची बातमी समल्यानंतर रेणू नागर हिला मानसिक धक्का बसून ती जमिनीवर कोसळली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रेणूची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे.

महिन्याभरापूर्वी रवी-रेणू यांनी आपले घर सोडून निघून गेले होते. त्यावेळी रेणूच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेण्याचा रवीवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, रेणूचा जबाब नोंदविल्यानंतर पोलिसांनी रवी नट याला सोडले. त्यानंतर ते अल्वरला परतले होते.

- Advertisement -

दरम्यान, रेणूचा प्रियकर रवी नट याने विषारी पदार्थ खाल्ल्यानंतर सायंकाळी उशिरा ७ वाजण्याच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचार सुरु असतानाच रवी नटचा मृत्यू झाला. ही बातमी समजल्यानंतर रेणू मानसिक तणावाखाली गेली. त्यातच ती बेशुद्ध पडली. तिला तात्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, सध्या रेणूची परिस्थिती गंभीर असून तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

विवाहीत आणि तीन मुलांचा पिता असलेल्या रवी नटशी रेणूचे प्रेमसंबंध होते. भरतपूरचा रहिवासी असलेला रवी रेणूला गेल्या तीन वर्षांपासून तिच्या घरी तबला शिकवण्यासाठी येत होता. अल्वरमध्ये एका भाड्याच्या घरात तो राहत होता. यावेळी या दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले आणि ३० जून रोजी हे दोघेही आपापल्या घरातून निघून गेले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Rain: मुंबईत आज, उद्या ‘येलो’ अलर्ट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -