Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ची पटकथा नेमकी काय आहे?

ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ची पटकथा नेमकी काय आहे?

Subscribe

भारतासाठी आजचा दिवस खूप अभिमानास्पद आहे. नाटू नाटूला ऑस्कर मिळाल्यानंतर भारतातील ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्मला देखील ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ‘द एलिफंट व्हिस्परर’ हा नेटफ्लिक्सची डॉक्यूमेंट्री आहे. याचे दिग्दर्शन कार्तिकी गोन्साल्विस यांनी केले असून गुनीत मोंगा यांनी निर्मिती केली आहे. या डॉक्यूमेंट्रीची कथा एकटा सोडलेला हत्ती आणि त्याची काळजी घेणाऱ्यांमधील नात्याबद्दल आहे.

गुनीत मोंगाची प्रतिक्रिया

ऑस्कर पुरस्कार पटकावल्यानंतर या डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्मची निर्माती गुनीत मोंगाने ऑस्कर अवॉर्ड हातात घेऊन तिने फोटो शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “आजची रात्र ऐतिहासिक आहे. कारण भारतीय निर्मितीसाठी हा पहिलाच ऑस्कर आहे. धन्यवाद आई-बाबा, गुरुजी, माझे सह-निर्माते अचिन जैन, टीम सिख्या, नेटफ्लिक्स, आलोक, सराफिना, WME बॅश संजना. माझा प्रिय पती सनी. कार्तिकी, ही कथा सर्व महिलांसमोर आणल्याबद्दल… भविष्य येथे आहे. जय हिंद.”

काय आहे कथा?

- Advertisement -

The Elephant Whispers

‘द एलिफंट व्हिस्पर्स’ची कथा हत्ती आणि त्यांचे काळजी घेणारे बोमन आणि बेला यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटात निसर्गाशी नाळ जोडली गेली आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा हत्ती आणि त्याचा मालक यांच्यातील प्रेमावर आधारित आहे. या दोघांमधला बंध कथेत दाखवण्यात आला आहे, तो आपल्या हत्तीसोबत कसा खेळतो, मजा करतो, त्याचप्रमाणे त्याची बायकोही त्या हत्तीसोबत खेळताना मजा घेते. हे जोडपे हत्तीसाठी आपले जीवन कसे समर्पित करते हे या कथेत दाखवण्यात आले आहे.

प्रियंका चोप्राने देखील केलं होतं कौतुक

- Advertisement -

प्रियंकाने देखील या डॉक्यूमेंट्री शॉर्ट फिल्मचं कौतुक केलं होतं. सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत प्रियंकाने लिहिलं होतं की, भावनांनी भरलेली हृदयस्पर्शी कथा, मी नुकताच पाहिला, मला खूप आवडला. ही अद्भुत कथा जिवंत केल्याबद्दल कार्ती गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांचे खूप खूप आभार.


हेही वाचा :

‘नाटू-नाटू’ला ऑस्कर मिळवून देण्यात ‘या’ व्यक्तीचा मोलाचा वाटा

- Advertisment -