Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन बॉलीवूड स्टार्स जाहिरातीतून कमावतात कोट्यवधी रुपये

बॉलीवूड स्टार्स जाहिरातीतून कमावतात कोट्यवधी रुपये

प्रसिद्ध फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो याने कोका-कोला या कोल्ड ड्रींकचे 2 बॉटल बाजुला हटवली आणि यानंतर कोका कोला कंपनीची मार्केट वॅल्यू कमी झाली होती.

Related Story

- Advertisement -

भारत देशात अनेकदा शरिरासाठी,आरोग्यासाठी घातक असणाऱ्या वस्तुंवर किंवा पदार्थांवर जसे की गुटखा,पान तंबाखु, ड्रिंक्स, इत्यादिंवर ‘सावधान’ असे लिहले जाते तरी सुद्दा अनेक लोकं या मजकुराकडे दुर्लक्ष करुन त्याचे सेवन करतात. त्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. भारता हा सिनेमाप्रेमी किंवा सिनेमावेडा देश मानला जातो. अनेक सेलिब्रींटीचा प्रभाव भारतीय लोकांवर तत्परतेने होतो. कोणताही कलाकार काय खातो,कोणत्या ब्राँन्डचे कपडे वारतो, त्याच्याकडे कोणती लक्जरी कार आहे सर्व गोष्टींचे अनुकरण करतो. आणि त्याच गोष्टी किंबहूना त्याच्या सारखी लाइफ स्टाईल जगण्याचा प्रयत्न करतो. आणि हि बाब लक्षात घेता सेलिब्रीटिंनी केलेल्या अनेक हानिकारक वस्तुंच्या जाहीरातीवर भूलून त्या वस्तुंचे सेवन फक्त त्यांचा आवडता सेलिब्रीटी टिव्हीवर बोलत आहे यामुळे आनंदाने करतात.

यूरो 2020 मधील एका प्रेस कॉन्फ्रंरसं मध्ये प्रसिद्ध फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो याने कोका-कोला या कोल्ड ड्रींकचे 2 बॉटल बाजुला हटवली आणि यानंतर कोका कोला कंपनीची मार्केट वॅल्यू कमी झाली होती. तसेच कंपनीला 29 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. कोका-कोला 1974 पासुन फीफा स्पर्धेला स्पॉन्सर करत आहे. तरिसुद्धा रोनाल्डोने साहस दाखवत हे पाऊल उचलले. आणि अश्या प्रकारचे धाडस भारतातील कलाकार,स्पर्धक किंवा सेलिब्रीटीकंडे क्वचीतच पाहायला मिळेल.
भारतीय स्टार अनेकदा पेप्सी, कोका-कोला ,गुटखा ब्रांड एंडोर्स करतांना दिसतात. आणि या ब्रांड्सपासुन इतकी रक्कम सेलिब्रीटी कमावतात कि ते या ब्रांड्सला सोडू शकत नाही. इंडियन स्टार्स एखाद्यं ब्राँन्ड एंडोर्समेंट लोकांच्या आरोग्याला समोर ठेऊन त्यांची काळजी घेत या जाहीराती करण्यास नकार देत असेल असे आज प्रर्यंत घडले नाहीये.
काही दिवसांपुर्वी शाहरुख खान आणि अभिनेता अजय देवगण चक्क एका विमल गुटख्याच्या जाहीरातीमध्ये एकत्र झळकले होते. असे बोलण्यात येते यादेघांचे एकमेकांशी काही खास पटत नाही. म्हणून त्यांनी कोणत्याही सिनेमात एकत्र काम केलं नाही. मात्र या गुटख्याच्या जाहीरतीचा प्रसार करण्यास या ब्रंन्डच्या मालकाने दोघांना एकत्र आनण्या करीता किती तगडी रंक्कम दोघांना दिली असेल हे सांगणे जरा कठीनच आहे. तीन महीन्या पुर्वी आलेल्या या जाहीरातीनंतर ट्विटरवर #NoMySRK ट्रेंड झालं होतं. लोकांना शाहरुखने केलेल्या या जाहीरातीचा प्रचार आवडला नाही.


- Advertisement -

हे हि वाचा – अभिनेत्रीने केला 14 लोकांवर लैंगिक शोषणाचा आरोप

- Advertisement -