24 व्या इंडियन टेलिव्हिजन अॅकेडमी पुरस्कार सोहळ्यात मनोरंजन विश्वात विविध प्रवर्गात सर्वोत्तम कामगिरी बजावणाऱ्या कलावंतांचा गौरव करण्यात येतो. विख्यात सेलेब्रिटी व्यासपीठावर एकत्र आल्याने हा सोहळा भव्य आणि विलक्षण क्षणांनी सजलेला असा चमकदार सोहळा ठरेल, यात शंका नाही. टीव्ही, चित्रपट आणि ओटीटीमधील सर्वात प्रतिभावान कलावंतांच्या कामगिरीवर कार्यक्रमाचा प्रकाशझोत स्थिरावलेला असल्याने ही संध्याकाळ एक संस्मरणीय संध्याकाळ ठरणार आहे.
या झगमगणाऱ्या रात्रीत विस्मयकारक नृत्याचे आविष्कार सादर होणार असून ‘स्टार प्लस’ वाहनीवरील लोकप्रिय ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील समृद्धी शुक्ला ऊर्फ अभिरा आणि रोहित पुरोहित ऊर्फ अरमान यांचे सादरीकरण ही त्यांच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी ठरणार आहे. ‘देखा तैनू’ आणि ‘ओह माही’ या भावविभोर गाण्यांवर मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या नृत्य सादरीकरणाने ही जोडी या झगमगणाऱ्या रात्रीला एक रोमँटिक आणि जादुई स्पर्श करेल. २४व्या इंडियन टेलिव्हिजन अॅकेडमी पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांची आवडती ऑन-स्क्रीन जोडी- अभिरा आणि अरमान यांनी नृत्य सादरीकरण करणार आहेत.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील समृद्धी शुक्ला आणि रोहित पुरोहित यांच्या अभिनयाची वाहवा झाली आणि त्यांना या भूमिकेने एक ओळख मिळवून दिली. आपल्या आवडत्या जोडीने या सोहळ्यात सादर केलेला कलाविष्कार पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुर आहेत. ‘रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका ‘टीआरपी’च्या तक्त्यावर अधिराज्य गाजवत असताना समृद्धी शुक्ला आणि रोहित पुरोहित या दोहोंमधील सहजसुंदर केमिस्ट्री चाहत्यांची मने जिंकत आहे. नवे वर्ष साजरे करताना त्यांच्या मोहक कामगिरी पाहण्यास त्यांचे चाहते सज्ज आहेत.
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील समृद्धी शुक्ला ऊर्फ अभिरा मनोगत व्यक्त करताना म्हणाली, “२४व्या इंडियन टेलिव्हिजन टेलिव्हिजन अॅकेडमी पुरस्कार सोहळ्यात सहभागी होणे हा माझ्याकरता अविस्मरणीय अनुभव होता, जो माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या रात्रीच्या सर्वोत्तम क्षणांपैकी एक म्हणजे नृत्याचे सादरीकरण. रोहित पुरोहित ऊर्फ अरमान आणि मी मिळून ‘देखा तैनू’ आणि ‘ओह माही’ या गाण्यांवर नृत्य सादर केले. आमच्या शूट शेड्यूलनंतर आम्ही आठवडाभर नृत्याची तयारी केली. हा एक जादूई अनुभव होता, माझे चाहते कधी एकदा आमची नृत्य अदाकारी अनुभवतील, असे मला झाले आहे. ”
२४वा इंडियन टेलिव्हिजन अॅकेडमी पुरस्कार सोहळा ३१ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी साडेसात वाजता ‘स्टार प्लस’ वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde