नामांकित ऑस्कर पुरस्कारातून ‘जल्लीकट्टू’ सिनेमाला बायबाय!

९३ व्या आंतरराष्ट्रीय ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील सिनेमाच्या नामांकनातून भारताचा ऑफिशियल एंट्री दाक्षिणात्य सिनेमा 'जल्लीकट्टू'चं नाव वगळण्यात आले आहे.

India's Official Entry Jallikattu Fails To Make International Film
नामांकित ऑस्कर पुरस्कारातून 'जल्लीकट्टू' सिनेमाला बायबाय!

सिनेमात अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवून एकदा तरी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित व्हावं, असं स्वप्न अनेक सिनेकलाकार आपल्या ध्यानी मनी ठेवतात. सिनेमात दर्जेदार अभिनय करण्यासाठी सिनेकलाकार काबाडकष्टही करतात. मात्र, काही वेळेला स्वप्न ते स्वप्नचं राहतं, असंचं काहिसं स्वप्नभंग झालं आहे एका दाक्षिणात्य सिनेमातील कलाकारांचं. आगामी होणाऱ्या ९३ व्या आंतरराष्ट्रीय ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील सिनेमाच्या नामांकनातून भारताचा ऑफिशियल एंट्री दाक्षिणात्य सिनेमा ‘जल्लीकट्टू’चं नाव वगळण्यात आलंय. या पुरस्कार वितरण समारंभात जूरींकडून एकूण १५ सिनेमांना नॅामिनेशन देण्यात आलं आहे. दरम्यान, यंदाच्या ऑस्करच्या यादीत ‘जल्लीकट्टू’ सिनेमाचं नाव वगळण्यात आल्यानं ऑस्करच्या स्पर्धेत ‘जल्लीकट्टू’ सिनेमाची धाव थांबली आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट समूहात पहिल्या पाच क्रमांकासाठी निवडलेल्या १५ फीचर सिनेमांमध्ये स्थान मिळविण्यात ‘जल्लीकट्टू’ या सिनेमाला अपयश आलं आहे. ‘जल्लीकट्टू’ या सिनेमाला ९३ व्या सर्वोत्कृष्ठ आंतरराष्ट्रीय फीचर समूहात नामांकन मिळवण्यासाठी भारताकडून पाठवण्यात आले होते.

आंतरराष्ट्रीय भाषेतील १५ सिनेमांची निवड

‘द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स and सायन्सेस’कडून आंतरराष्ट्रीय भाषेतील १५ सिनेमांची निवड करण्यात आली. यामध्ये ‘जल्लीकट्टू’ या सिनेमाचं नाव समाविष्ठ नाहीये. दिग्दर्शक लीयो जोस पेल्लीसरी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ऑस्करसाठी नामांकन देण्यात आलेल्या सिनेमांमध्ये रुस, चेक रिपब्लिक, चीली, रोमानीया, बोस्नीया आणि हर्जगोवीना, फ्रांस, गुवाटेमाला, हाँगकाँग, इरान, आयवरी कोस्ट, मेक्सिको, तायवान आणि ट्यूनिशीया या देशांतील सिनेमांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय फीचर सिनेमांच्या समुहात तब्बल ९३ सिनेमांचं नाव नोंदविण्यात आलं होतं. ऑस्कर पुरस्कार वितरीत करणाऱ्या सदस्यांकडून ९३ पैकी अवघ्या १५ सिनेमांची निवड करण्यात आलीय. या ऑस्कर पुरस्कारासाठीचं शेवटच्या नामांकनांची घोषणा १५ मार्चला करण्यात येणार आहे. ‘जल्लीकट्टू’ सिनेमा टोरंटो येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट सोहळ्यामध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. तेथे सिनेचाहत्यांकडून या सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळाला होता.


हेही वाचा – राजीव कपूर यांच्या निधनाने त्यांचे ९४ वर्षीय व्यवस्थापक भावनाविवश!