घरमनोरंजनक्राइम पेट्रोलमध्ये काम करणाऱ्या 'या' अभिनेत्रीने केली आत्महत्या

क्राइम पेट्रोलमध्ये काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने केली आत्महत्या

Subscribe

इंदोर येथील टीव्ही कलाकार प्रेक्षा मेहता हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रेक्षा इंदोर येथे राहणारी असून लॉकडाऊनमुळे सध्या आपल्या घरी आली होती. क्राइम पेट्रोलसह काही मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या होत्या. तिच्या आत्महत्येबाबत कुटुंबियांनी सांगितले की, प्रेक्षा काही दिवसांपासून तणावाखाली होती. आत्महत्येपूर्वी तिने सोशल मीडियावर आपले स्टेटस अपडेट केले असून त्यावर आपल्या स्वप्नांचे तुटणे सर्वात वाईट असते, असा नैराश्यजनक मजकूर लिहिला आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रात करोनाचे ८० टक्के रुग्ण लक्षणं नसलेले – मुख्यसचिव

- Advertisement -

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

प्रेक्षाने तिच्या इंदोर येथील बजरंग नगरमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र तिच्या कुटुंबियांनी प्रेक्षा खुपच तणावाखाली असल्याचे सांगितले आहे. प्रेक्षाने सोमवारी रात्री आत्महत्या केली. छोट्या पडद्यावरील क्राइम पेट्रोलच्या काही एपिसोडमध्ये तिने काम केले आहे. तसेच लाल इश्क आणि मेरी दुर्गा मालिकेतही तिला प्रेक्षकांनी पाहिले आहे. सोमवारी रात्री उशीरापर्यंत प्रेक्षा तिच्या मोबाईलवर होती. तिने सोशल मीडियावर अखेरची पोस्ट शेअर केली. ही पोस्ट तिची मनस्थिती दर्शवणारी होती. सकाळी प्रेक्षाच्या वडिलांनी जेव्हा तिच्या रुममध्ये प्रवेश केला, तेव्हा प्रेक्षा त्यांना पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली. कुटुंबियांनी तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -