घरमनोरंजन'वाय' चित्रपटाने प्रेरित होऊन चित्रपटगृहातच केलं मुलीचं बारसं

‘वाय’ चित्रपटाने प्रेरित होऊन चित्रपटगृहातच केलं मुलीचं बारसं

Subscribe

चित्रपटाने प्रेरित होऊन कोल्हापूरमधील सई राजेशिर्के देशमाने आणि मनोज देशमाने या जोडप्याने आपल्या मुलीचा अनोख्या पद्धतीने नामकरण विधी केला

अजिय वाडीकर दिग्दर्शित वाय हा हायपरलिंक चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. स्त्री भ्रूण हत्या या गंभीर विषयावर भाष्य करणाऱ्या ‘वाय’न चित्रपटाने अनेक स्त्रियांना या संवेदनशील विषयावर पुढे येऊन बोलण्यास प्रोत्साहन दिले. यामुळे अनेक महिलांनी आपला अनुभव वाय चित्रपटाच्या टीमसोबत शेअर केला. या सामाजिक विषयावर आधारित चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, तसेच या चित्रपटाचे कौतुकही केले जात आहे.

दरम्यान, याचं चित्रपटाने प्रेरित होऊन कोल्हापूरमधील सई राजेशिर्के देशमाने आणि मनोज देशमाने या जोडप्याने आपल्या मुलीचा अनोख्या पद्धतीने नामकरण विधी केला. त्यांनी ‘वाय’चा एक खास शो कोल्हापूरमध्ये आयोजित केला होता. या शोच्या दरम्यान चित्रपटगृहा मध्येच त्यांनी मुलीचे नाव ठेवले. खरंतर आजकालच्या काळात असा अनोखा विचार करणाऱ्या जोडप्याने चित्रपटगृहामध्ये आपल्या मुलीचे बारसे करुन ‘वाय’ सारखा चित्रपट यावेळी दाखवून समाजात मौलाचा संदेश समाजात पोहोचला. इतकंच नव्हे तर या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव ‘मुक्ता’ असे ठेवले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

- Advertisement -

खरंतर वाय चित्रपटातील हा विषय जास्तीसजास्त लोकांपर्यंत पोहोचावा, हा या जोडप्याचा खरा हेतू होताया शोच्या दरम्यान चित्रपटगृहा मध्येच त्यांनी मुलीचे नाव ठेवले, त्यामुळे आपल्या मुलीच्या बारशाचे चित्रपगृहात असे आयोजन पाहून वाय चित्रपटाची टीम सुद्धा आश्चर्यचकित झाली. वाय चित्रपटाचा विषय असा आहे की, तो प्रत्येक कुटुंबात पोहोचणे खूप गरजेचे आहे. तरच याबाबत समाजात जागरूकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे या जोडप्याने नामकरण विधीच्या निमित्ताने हा विषय लोकांपर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न केला.


हेही वाचा :आरोह वेलणकरचा संजय राऊत यांना टोला, म्हणाला राऊत अजून…

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -