घरमनोरंजनप्रियांका इंस्टाग्रामच्या रिचलिस्टमध्ये ! एका पोस्टमागे कमावते ‘इतके’ रुपये

प्रियांका इंस्टाग्रामच्या रिचलिस्टमध्ये ! एका पोस्टमागे कमावते ‘इतके’ रुपये

Subscribe

इंस्टाग्राम रिचलिस्ट 2021 यादित अभिनेत्री प्रियांका चोप्राने तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बाजी मारली आहे.

सोशल मीडिया हे बॉलिवूड सेलिब्रीटींसाठी तगडं माध्यम मानलं जात. व्यक्तीगत तसेच व्यवसायिक आयुष्यातील अनेक घडामोडी कलाकार त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डलद्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. नुकतच इंस्टाग्रामने यंदाची रिच लिस्ट 2021 जाहीर केली आहे. यादिमध्ये 2 भारतीय व्यक्तींनी आपलं स्थान पटकावलं आहे. इंस्टाग्राम रिचलिस्ट 2021 यादित अभिनेत्री प्रियांका चोप्राने तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बाजी मारली आहे.

एका पोस्टसाठी प्रियांका घेते इतकं मानधन
बॉलिवूडची देसी गर्ल तसेच इंटरनॅशन स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. प्रियांका अनेक ब्राँन्डचे फोटोज,व्हिडिओ सतत पोस्ट करत असते. इंस्टग्रामवर प्रियांकाचे तब्बल 65 मिलियन फॉलोवर्स आहेत. तसेच प्रियांकाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करतात. इंस्टाग्राम रिचलिस्ट 2021 नूसार प्रियांका तिच्या प्रत्येकी एका पोस्ट करीता करोडो रुपये मानधन घेते. महितीनूसार प्रियांका इंस्टाग्रामच्या एका पोस्टसाठी जवळ-जवळ 3 कोटी रुपये चार्ज करते. जर प्रियांकाच्या गेल्यावर्षीच्या इंन्कमवर लक्ष दिले असता तिने तब्बल 271,000 डॉलर इतकी कमाई केली होती.

- Advertisement -

लिस्ट मधील टॉप 3 स्टार्स

या लिस्ट मधील प्रथम क्रमांक पटकवाणरा सेलिब्रिटी फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो हा ठरला आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो एका पोस्ट द्वारे 11.9 करोड़ रुपए कमवतो. तर दूसऱ्या नबंरवर ड्वेन जॉनसन तसेच तीसरा नंबर एरियाना ग्रांडे पटकावला आहे एरियाना एकापोस्ट मागे 10 कोटी रक्कम आकारते.

- Advertisement -


हे हि वाचा – सोनू सूदने शिक्षण क्षेत्रात टाकले पाऊल, सीए शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थांना देणार मोफत शिक्षण



 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -