घरताज्या घडामोडीआंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये 'दिल्ली क्राईम' ठरली सर्वोकृष्ट वेबसीरिज

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये ‘दिल्ली क्राईम’ ठरली सर्वोकृष्ट वेबसीरिज

Subscribe

या पुरस्कार सोहळ्यात सर्वात्कृष्ट्र ड्रामा सीरिजच्या श्रेणीत भारताच्या दिल्ली क्राईमसह अर्जेंटिना, जर्मनी, ब्रिटन आणि अनेक आंतरराष्ट्रीय वेबसीरिजचा समावेश होता.

२०१२ साली झालेल्या दिल्ली निर्भया प्रकरणावरील आधारित ‘दिल्ली क्राईम’ ही वेबसीरिज एमी पुरस्कार मिळवणारी भारताची पहिलीच वेबसीरिज ठरली आहे. आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारामध्ये २०२०मध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी नेटफ्लिक्सवरील दिल्ली क्राईम वेबसीरिजचा सन्मानित करण्यात आले आहे. ४८ वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा कोरोना व्हायरसच्या काळामुळे व्हर्च्युअली पद्धतीने पार पडला पडला.

- Advertisement -

या पुरस्कार सोहळ्यात सर्वात्कृष्ट्र ड्रामा सीरिजच्या श्रेणीत भारताच्या दिल्ली क्राईमसह अर्जेंटिना, जर्मनी, ब्रिटन आणि अनेक आंतरराष्ट्रीय वेबसीरिजचा समावेश होता. पण या श्रेणात दिल्ली क्राईमने बाजी मारली आहे. संपूर्ण देशाला हादरवणारे निर्भया प्रकरणावर आधारित दिल्ली क्राईम वेबसीरिज आहे. याप्रकरणात ज्या तत्परतेने दिल्ली पोलिसांनी केलेला तपास, काही तासात आरोपींना केलेली अटक, तसेच या तपासात पोलिसांना आलेल्या अडचणी यासर्व गोष्टी दिल्ली क्राईम वेबसीरिजमध्ये मांडण्यात आल्या आहेत.

दिल्ली क्राईम ही वेबसीरिज ७ एपिसोडची आहे. यामध्ये अभिनेत्री शेफाली शाह हिने मुख्य भूमिका साकारली आहे. पोलीस उपायुक्त वर्तिका चतुर्वेदी यांची व्यक्तिरेखा शेफाली शाह हिने केली आहे. याव्यतिरिक्त रसिका दुगल, यशस्विनी डायमा, राजेश तैलंग, आदिल हुसैन, डेन्झिल स्मिथ, जया भट्टाचार्य, मृदुल शर्मा, गोपाल दत्त, आकाश दहिया, अनुराग अरोरा, अभिलाषा सिंह, गोपाल दत्त तिवारी या कलाकारांचा समावेश आहे. या वेबसीरिजचे लेखक आणि दिग्दर्शक रिची मेहता आहेत. आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्डमध्ये यापूर्वी २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी ‘सेक्रेड गेम्स सीझन वन’ नामांकन मिळाले होते. पण पुरस्कार मिळाला नव्हता.

- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ सीनमुळे ‘अ सूटेबल बॉय’ आणि ‘नेटफ्लिक्स’वर कारवाई होणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -