International Emmy Awards 2021: नवाजुद्दीन सिद्दीकी, वीर दास आणि सुष्मिता सेनचा ‘आर्या’ पुरस्कारापासून दूर

यावेळी भारताला एकही विजय न मिळाल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे.

International Emmy Awards 2021: Nawazuddin Siddiqui, Veer Das and Sushmita Sen drop out of 'Arya' award

न्यूयॉर्कमधील आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२१ यामध्ये भारताला पुरस्काराची खूप आशा होती. याच पार्श्वभूमीवर यावेळी अभिनेता वीर दास, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अभिनेत्री सुष्मिता सेनच्या वेबसीरीज ‘आर्या’लाही भारताकडून नॉमिनेट करण्यात आले होते आणि सर्वांनाच पुरस्काराची अपेक्षा होती. मात्र यावेळी भारताला एकही पुरस्कार न मिळाल्याने चाहत्यांची निराशा होणार आहे. दरम्यान, २२ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क शहरात आयोजित समारंभात २०२१ च्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

नेटफ्लिक्सच्या ‘सिरीयस मॅन’साठी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारासाठी नामांकन झालेला नवाजुद्दीन सिद्दीकी हा पुरस्कार मिळवण्यात अपयशी ठरला आहे. नवाजुद्दीनने ‘सिरीयस मॅन’ चित्रपटात अय्यन मणि ही भूमिका साकारली होती. मात्र हा पुरस्कार ब्रिटिश अभिनेता डेव्हिड टेनंट (डेस) याने पटकावला आहे. सुधीर मिश्रा दिग्दर्शित, “सिरीयस मॅन” हा चित्रपट लेखक मनू जोसेफ यांच्या २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या याच नावाच्या कादंबरीचे रूपांतर आहे.इस्त्रायली अभिनेता रॉय निक आणि कोलंबियन ख्रिश्चन टप्पन यांनाही या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

अभिनेता आणि कॉमेडियन वीर दासच्या नेटफ्लिक्स कॉमेडी स्पेशल ‘वीर दास: फॉर इंडिया’ या लोकप्रिय फ्रेंच शो ‘कॉल माय एजंट’, यूकेच्या ‘मदरलँड: ख्रिसमस स्पेशल’ आणि कोलंबियन मालिका ‘प्रोमेसास डी कॅम्पाना’ सोबत कॉमेडी श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे.  ‘वीर दास’ हा पुरस्कार जिंकू शकला नाही पण त्याला जे पदक मिळाले आहे.तो त्याने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vir Das (@virdas)

 अभिनेत्री सुष्मिता सेनची वेबसीरीज ‘आर्या’ ने २०२१ च्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये भारतासाठी नामांकन मिळवले. मात्र, या वेबसीरीजला एमी अवॉर्ड मिळाला नाही.त्यामुळे चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

 


हे ही वाचा – शिवसेना आमदाराला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवणाऱ्याला राजस्थानमधून