25 नोव्हेंबरला इंटरनॅशनल एमी अॅवॉर्डसची यादी जाहीर करण्यात आली. भारतात हा कार्यक्रम 26 नोव्हेंबरला सकाळी लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आला. या अॅवॉर्ड फंक्शनमध्ये भारताकडून बेस्ट ड्रामा कॅटेगरीकरता अनिल कपूर , आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला यांच्या भूमिका असलेली ‘द नाइट मॅनेजर’ ही वेबसीरिज पाठवण्यात आली होती.
25 नोव्हेंबरला इंटरनॅशनल एमी अॅवॉर्डस 2024चे आयोजन करण्यात आले होते. ज्यात हिंदी सिनेअभिनेता आणि स्टॅन्ड अप कॉमेडियन दास हे निवेदकाच्या भूमिकेत होते. हा कार्यक्रम इंटरनॅशनल अॅकेडमी ऑफ टेलिव्हिजन आर्टस् अँड सायंन्सेसकडून आयोजित केला जातो. या वर्षीचा हा अॅवॉर्ड फंक्शन खास आहे कारण या पुरस्काराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीयाने या पुरस्काराच्या निवेदनाची जबाबदारी सांभाळली आहे. हा अॅवॉर्ड जगातील काही प्रसिद्ध अॅवॉर्डस पैकी एक समजला जातो. यावर्षी हा समारंभ न्यूयॉर्क येथील हिल्टन मिडटाउनमध्ये पार पडणार आहे.
52 व्या इंटरनॅशनल एमी अॅवॉर्डस साठी एकूण 21 देशांमधील जवळपास 56 कलाकरांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. यंदा हे पुरस्कार 14 वेगवेगळ्या विभागांसाठी देण्यात येणार आहेत. यात सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, विनोदी अभिनेता, अभिनेत्री, डॉक्युमेंटरी, ड्रामा सीरिज, किडस अॅनिमेशन, आर्ट प्रोग्रॅमिंग अशा अनेक कॅटगरी करण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर एमी पुरस्कार विजेत्यांची नावंही जाहीर करण्यात आली आहेत. भारतात हा कार्यक्रम 26 नोव्हेंबर 2024 ला पहाटे 3.30 ते सकाळी 9.30 पर्यंत प्रसारित करण्यात आला.
इंटरनॅशनल एमी अॅवॉर्डस 2024 च्या विजेत्यांची यादी :
सर्वोत्कृष्ट अभिनेता – टिमोथी स्पाल (द सिक्स्थ कमांडेंट)
आर्ट्स प्रोग्रामिंग – पियानोफोर्टे
विनोदी कलाकार – डिवीजन पलेर्मो
रेस्टोरेंट मिसवर्स्टैंड – सीजन 2- नॉन-स्क्रिप्टेडट एंटरटेनमेंट अवॉर्ड
किड्स: फैक्चुअल एंड एंटरटेनमेंट अवॉर्ड – ला विदा सेक्रेटा डे तू मेंटे (द सीक्रेट लाइफ ऑफ योर माइंड)
किड्स लाइव-अॅक्शन – एन अफ ड्रेंगने (वन ऑफ द बॉयज)
किड्स: अॅनिमेशन अॅवॉर्ड – टैबी मैक टैट
टीवी मूव्ही/मिनी-सीरिज अॅवॉर्ड – लीब्स काइंड (डियर चाइल्ड)
ड्रामा सीरीज अॅवॉर्ड – लेस गौटेस डी डियू (ड्रॉप्स ऑफ गॉड)
नॉन स्क्रिप्टेड ड्रामा सीरिज अॅवॉर्ड – रेस्टोरेंट मिसवरस्टैंड – सीजन 2
स्पोर्ट्स डॉक्यूमेंट्री – ब्रॉन: द इम्पॉसिबल फॉर्मूला 1
शॉर्ट-फॉर्म सीरिज – पंट डे नो रिटोर्न
मिनी-सीरिज – लिबेस काइंड (डियर चाइल्ड)
टेलीनोवेला अॅवॉर्ड – ला प्रोमेसा (द वॉव)
डॉक्यूमेंट्री अॅवॉर्ड – ओटो बैक्सटर: नॉट ए …. हॉरर स्टोरी
पुरस्कारापासून वंचित राहिली ‘द नाईट मॅनेजर’:
वीर दासबद्दल बोलायचं झाल्यास 2023 मध्ये त्यांना एमी अॅव़ॉर्ड मिळाला होता. यावर्षी अनिल कपूर , आदित्य रॉय कपूर आणि शोभिता धुलिपाला यांच्या भूमिका असलेली ‘द नाईट मॅनेजर’हीदेखील बेस्ट ड्रामा कॅटेगरीसाठी नॉमिनेट करण्यात आली होती. परंतु हा पुरस्कार फ्रेंच ड्रामा सीरिज लेस गौटेस डी डियू (ड्रॉप्स ऑफ गॉड) या सीरिजला देण्यात आला.
हेही वाचा : Gautami Deshpande : गौतमी देशपांडे मुंबईकरांच्या बेशिस्तपणावर भडकली?
Edited By – Tanvi Gundaye