अबुधाबी मध्ये रंगणार ‘IIFA’ पुरस्कार सोहळा, सलमान खान दिसणार होस्ट च्या भूमिकेत

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार सोहळा २०२२, या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड मधील अनेक कलाकार उपस्थिती लावणार आहेत. बॉलिवूड मधील दबंग खान या पुरस्कार सोहळ्याला होस्ट करणार आहे.

सध्या चित्रपट महोत्सव मोठ्या प्रमाणात पार पडत आहेत. कान्स फिल्म फेस्टिवल आणि मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सुद्धा यशस्वीरित्या पार पडले आहेत. आणि प्रेक्षकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर या फिल्म फेस्टिवलला प्रतिसाद दिला.  आता या फेस्टिवल नंतर प्रेक्षक इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्काराची (International Indian Film Academy Awards) IIFA सुद्धा वाट पाहात आहेत. UAE ची राजधानी असलेल्या अबुधाबीच्या यास बेटावर (Yas Island, Abu Dhabi) इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार सोहळा २ जून रोजी पार पडणार आहे. आणि या पुरस्कार सोहळ्याला होस्ट करणार आहे बॉलिवूडचा चुलबुल पांडे म्हणजे अभिनेता (salman khan) सलमान खान.

या पुरस्कार सोहळ्याची सुद्धा प्रेक्षकांमध्ये आतुरता दिसत आहे. इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार सोहळा (International Indian Film Academy Awards) IIFA २०२२ पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. कोव्हीड मुळे गेल्या दोन वर्षांपासून हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नव्हता. पण या वर्षी मात्र हा पुरस्कार सोहळा मोठया उत्साहात आणि दिमाखात पार पडणार आहे. यावर्षीचा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार सोहळा अबुधाबीच्या यास बेटावर होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सारा अली खान(sara ali khan), शाहिद कपूर(shahid kapoor), अनन्या पांडे, टायगर श्रॉफ आणि कार्तिक आर्यन यांसारखे सेलिब्रिटी सुद्धा सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर (neha kakkad)नेहा कक्कड, ध्वनी भानुशाली, हनी सिंग या गायकांची गाणी सुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by IIFA Awards (@iifa)

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार (International Indian Film Academy Awards) IIFA ३ जून रोजी निर्माता फराह खान कुंदर आणि अभिनेता अपारशक्ती खुराना होस्ट करणार आहेत. तर ४ जून रोजी बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान(salman khan), रितेश देशमुख(ritesh deshmukh) आणि मनीष पॉल हा पुरस्कार सोहळा होस्ट करताना दिसणारा आहेत. त्याच बरोबर या पुरस्कार सोहळ्यात बोनी कपूर, लारा दत्ता, माधुरी दीक्षित – नेने (madhuri dixit – nene), मिथुन चक्रवर्ती, बॉबी देओल, अर्जुन रामपाल, तमन्ना भाटिया हे कलाकार आवर्जून उपस्थित असणार आहेत.

बॉलिवूड मधील खान त्रयींनपैकी एक असलेला बॉलिवूड मधील दबंग खान म्हणजेच अभिनेता सलमान खान(salman khan) हा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार सोहळ्याचा एक भाग असणार आहे.
अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीमध्ये अबूधाबीमध्ये हा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार सोहळा अबुधाबी मध्ये पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची आतुरता प्रेक्षकांमध्ये दिसते आहे. पुरस्कार सोहळ्या सोबतच प्रेक्षकांना गाण्यांचा सुद्धा आस्वाद या सोहळ्यात घेता येणार आहे. हा पुरस्कार सोहळा सगळ्याच बाबतीत महत्वाचा असतो त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रेक्षकांना अजून काय अनुभवता येणार आहे, काय पाहता येणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.