लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारी कलाकृती ठरलाय. या सिनेमातून छत्रपती संभाजी महाराजांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर दर्शवली आहे. अभिनेता विकी कौशलचे त्याच्या दमदार अभिनयासाठी सर्वत्र कौतुक केले जात आहे. या सिनेमात त्याने शंभूराजांची भूमिका अगदी जीव ओतून साकारली आहे. त्यामुळे रिलीजच्या दहा दिवसानंतरही हा सिनेमा अनेक ठिकाणी हाऊसफुल सुरू आहे. दरम्यान, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी ‘छावा’ सिनेमा पाहिला आणि त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. (IPS Vishwas Nangre Patil shared special post after watching chhaava)
View this post on Instagram
ही पोस्ट त्यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ज्यात त्यांनी ‘छावा’ सिनेमाचे पोस्टर शेअर केले आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘छावा………ज़िंदा रहे….. काळजाला चिरत जातात या काव्यपंक्ती, ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोळ्यांत धगधगत्या सळ्या खुपसल्या जातात, त्यांची जीभ खेचून काढली जाते. सळसळतात धमन्या, ज्यावेळी त्यांच्या जखमांवर मीठ चोळले जाते! ‘मन के जीते जीत, मन के हारे हार, हार गये जो बिन लढे, उनपर हैं धिक्कार!’ केवढी उमेद केवढी प्रेरणा देणारे हे शब्द! स्वतःला मैदानात भिडायची, लढायची आणि शेवटच्या श्वासापर्यंत झुंझायची ऊर्जा देतात’.
‘हाथी घोडे, तोफ तलवारे फौज तो ‘तेरी सारी हैं पर जंजिरोंमे जकडा हुआ मेरा राजा अब भी सब पे भारी हैं! छत्रपती संभाजी महाराज हे एक गारूड आहे. मराठी माणसाच्या स्वभिमानाचे, स्फुल्लिंगाचं प्रतीक आहे, स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत, मूर्तिमंत द्योतक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे प्रौढ, प्रताप, पुरंदर स्वरूप आहे. असा पराक्रमी, शूर आणि चतुरस्त्र भूप होणे नाही. प्रभु शंभूराजे, शतशः नमन तुम्हाला! काय घ्यावं आम्ही मावळ्यांनी तुमच्या धगधगत्या आयुष्यातून? आम्ही घ्यावा निर्भयपणा, आम्ही सोडावी लाचारी आणि गुलामगिरी, विचारांची आणि कृतींची, आम्ही सोडावं स्वार्थी आणि घुस्मटलेलं जगणं, घ्यावी कणभर तरी आपल्याकडून जिद्द, करारी बाणा आणि महाराष्ट्र धर्म! समतेचा, नीतिमत्तेचा शिकावा धडा! राहावा मनोमनी चिंतावा क्षणोक्षणी, शेर शिवराज आणि त्यांचा छावा! जगदंब जगदंब!’
विश्वास नांगरे पाटील यांची ही पोस्ट सध्या सोशल मिडीयावर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यावर गायक अवधूत गुप्तेने भगव्या झेंड्याचे ईमोजी शेअर केले आहेत.
हेही पहा –
Sushmita Sen : सुष्मिताची लगीनघाई, वयाच्या 49 व्या वर्षी शोधतेय परफेक्ट पार्टनर