घरमनोरंजन'जिंदगी.. कैसी है पहेली' इरफानच्या शब्दातून

‘जिंदगी.. कैसी है पहेली’ इरफानच्या शब्दातून

Subscribe

इरफान सध्या नक्की काय करत आहे? त्याची तब्येत कशी आहे? त्याला नक्की काय वाटत आहे हे त्यानंच त्याच्या शब्दात सांगितलं आहे. नक्की काय म्हटलं आहे इरफाननं हे खास तुमच्यासाठी.

आयुष्यात कधी कोणते वळण येईल हे कोणालाच कळणं शक्य नाही. अभिनेता इरफान खानच्या बाबतीतदेखील हेच घडले. मार्च महिन्यात इरफानला न्यूरोअॅन्डोक्राईन कॅन्सर असल्याचं समजलं आणि सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. संपूर्ण जगातून त्याच्यासाठी लोक प्रार्थना करू लागले. इरफान सध्या नक्की काय करत आहे? त्याची तब्बेत कशी आहे? त्याला नक्की काय वाटत आहे हे त्यानंच त्याच्या शब्दात टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलं आहे. नक्की काय म्हटलं आहे इरफाननं हे खास तुमच्यासाठी.

‘तुमचा मुक्काम इथपर्यंतच, चला आता’

मला न्यूरोअॅन्डोक्राईन कॅन्सर झाला आहे हे समजून आता बराच काळ लोटला आहे. हा आजार दुर्मिळ आहे किंवा याबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. याचे उपचार खूप कमी आहेत हे सगळं आता माझ्या सहज लक्षात आलं आहे. आता माझ्या आयुष्याचा हा अविभाज्य भाग झालाय जणू. खरं सांगू का? मी अगदी मजेत होतो. अगदी फास्ट ट्रेनप्रमाणे माझा आयुष्याचा प्रवास चालू होता. माझी स्वप्नं, माझं ध्येय, माझी कामं या सगळ्यात प्रचंड व्यस्त होतो. मागे वळून पाहायला पण वेळ नव्हता. पण अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी थाप मारली. सहज पाहिलं तर हा तर आयुष्य थांबवणारा टीसी, मला म्हणाला, ‘तुमचा मुक्काम इथपर्यंतच, चला आता.’ मी अचानक गोंधळलो, मी म्हटलं त्याला ‘नाही, नाही. इथं नाही मला उतरायचं’. मित्रांनो हेच आयुष्य आहे. अचानक कधी कुठे काय तुमच्यासाठी घेऊन येईल सांगता येत नाही.

- Advertisement -

आयुष्यात अचानक सगळाच गोंधळ

हे सर्व समोर आल्यानंतर अचानक सगळा गोंधळच झाला ना हो आयुष्यात. सर्वांना बसलेला धक्का, पुढे नक्की काय? सगळी भीती, धक्का सर्व काही भावना एकत्रच होत्या. त्यावेळी मला हे सगळं सहनच करता येत नव्हतं. मला फक्त स्वतःच्या पायावर परत उभं राहायचं आहे इतकंच कळत होतं. काहीच होत नव्हतं. कोणतीही प्रेरणा मिळत नव्हती. हतबल झालो होतो. लॉर्ड्सच्या बाजूला असणाऱ्या रूग्णालयात त्याच हतबलतेने प्रवेश केला. माझ्यावर होणाऱ्या उपचारादरम्यान एकदा मी बाल्कनीत उभा होतो. सहज माझं लक्ष गेलं. दुसऱ्या बाजूला लॉर्ड्स आहे आणि या बाजूला रूग्णालय त्यामध्ये काही असेल तर तो रस्ता आहे. जीवन आणि मृत्यूच्या या खेळात होता फक्त एक रस्ता. अचानक एक नवी उमेद मिळाली. सगळी शक्ती एकवटून मी माझा खेळ योग्यपणे खेळू शकतो हे अचानक मला जाणवलं आणि आता मी सगळ्या गोष्टींसाठी सज्ज झालो आहे.

सगळ्यांनीच माझ्यासाठी केली प्रार्थना

माझ्या या प्रवासात मी ओळखत असलेल्या नसलेल्या सर्वच लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आहे. या प्रार्थनांमधून झाडांच्या प्रत्येक पान, डहाळीप्रमाणेच माझं आयुष्य कुतूहल आणि आनंदानं भरून गेलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -