इरफान खानने भले या जगाला अलविदा केले असले तरीही तो चाहत्यांच्या मनात घर करुन गेलायं. अभिनेत्याने आपल्या सिनेमांमधून चाहत्यांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. अशातच इरफानच्या चाहत्यांसाठी बातमी आहे. कारण इरफानचा अखेरचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिनेमा ‘द सॉग्न ऑफ स्कॉर्पियन्स’ प्रदर्शित होणार आहे.
इरफान खान याला चाहते किती पसंद करतात हे या ट्रेलरमधून खरोखर पहायला मिळतेय. अभिनेत्याचा मुलगा बाबिल खान याने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. याला एक कॅप्शन ही दिले आहे. याचसोबत त्याने या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित कधी होणार हे सुद्धा सांगितले आहे. येत्या २८ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
खरंतर द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स सिनेमा हा २०१७ मध्येच प्रदर्शित करण्यात आला होता. तो सिनेमा त्यावेळी ही प्रेक्षकांकडून पसंद केला गेला. मात्र तेव्हा तो Swiss-French-Singaporean आणि राजस्थानी भाषेत तयार करण्यात आला होता. परंतु आता तो हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. सिनेमात इरफान सोबत गोशिफतेह फराहानी, वहीदा रहमान आणि शशांक अरोरा सुद्धा आहे. सिनेमाची कथा नूरा नावाच्या मुलीवर आहे. जी आपल्या आजीकडून प्राचीन हिलिंग आर्ट स्कॉर्पियन सिंगिंग शिकत आहे. इरफान एक उंट विक्री करणारा व्यक्ती दाखवला आहे. ज्याला नूरा हिच्यावर प्रेम जडते.
द सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्स इरफान याच्या आयुष्यातील अखेरचा प्रोजेक्ट नव्हे तर खरोखरंच त्याच्या करियरचा हा अखेरचा सिनेमा असणार आहे. २०१९ मध्ये आजारी असताना सुद्धा इरफान अंग्रेजी मीडियमचे शूटिंग करत होता. हा सिनेमा २०२० मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. ऑगस्ट २०१७ मध्ये स्विर्त्झलँन्डच्या ७० व्या लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सॉन्ग ऑफ स्कॉर्पियन्सचा प्रीमियर झाला होता. तर २९ एप्रिल २०२० रोजी कॅन्सरमुळे इरफानचे निधन झाले.
हेही वाचा: ‘धडक-2’ मधून जान्हवी आणि इशानची एक्झिट? करण जोहर म्हणाला…