Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन इरफान खानच्या लेकाचे सिनेसृष्टीत पदार्पण

इरफान खानच्या लेकाचे सिनेसृष्टीत पदार्पण

वडिलांच्याा पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा विचार बाबीलने केला आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित ‘बुलबुल’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. आता अनुष्का एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेवून येत आहे. अनुष्का निर्मित करणार असलेल्या या चित्रपटाचे नाव काला असे असणार आहे. विशष बाब म्हणजे या चित्रपटातून एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबील असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत. अनुष्का शर्मा इरफान खानच्या मुलाला म्हणजेच बाबील याला लॉंच करणार आहे. इरफान खानने त्यांच्या संपूर्ण आयुष्यात बॉलिवूडच नाहीतर हॉलिवूडमध्येही अनेक हिट सिनेमे दिले होते. मात्र गेल्या वर्षीच इफान यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने एक गुणी कलाकार सिनेसृष्टीने गमावला. पण आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा विचार त्यांच्या मुलाने केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Babil (@babil.i.k)

 बाबील याला अभिनेता बनायचे आहे असे त्याने काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे आता त्याला चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी अनुष्का शर्माने दिली असल्याचे म्हणले जात आहे. बाबील काम करणार असणाऱ्या ‘काला’ या चित्रपटाचे सध्या काश्मीरमध्ये चित्रीकरण सुरु आहे. बाबीलसोबत या चित्रपटात तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तृप्तीला ‘बुलबुल’ या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली होती. बाबील खान ने यापूर्वी ‘करीब करीब सिंगल’ या चित्रपटाच्या टिममध्ये असिस्टंट म्हणून काम केले होते. यासोबतच अनेक नाटकांच्या ग्रुपमध्येही बाबील सक्रिय असतो. सोशल मीडियावरही तो मोठ्या प्रमाणात फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्यामुळे आता बाबील त्याच्या या आगामी चित्रपटात कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


- Advertisement -

हे वाचा- हुमा कुरेशीचा ‘महारानी’ मधील नवा लूक

- Advertisement -