घरताज्या घडामोडीIrrfan Khan Birthday : इरफान खानचे 'हे' प्रसिद्ध चित्रपट पाहिलात का?

Irrfan Khan Birthday : इरफान खानचे ‘हे’ प्रसिद्ध चित्रपट पाहिलात का?

Subscribe

इरफान खान याची ही 55 वी जयंती आहे. इरफान हा दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा माजी विद्यार्थी आहे. त्याने बॉलीवूडसह हॉलीवूडमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. इरफानने 1988 मध्ये 'सलाम बॉम्बे'या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता इरफान खान याचा आज 7 जानेवारीला वाढदिवस आहे. इरफान खान याची ही 55 वी जयंती आहे. इरफान हा दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा माजी विद्यार्थी आहे. त्याने बॉलीवूडसह हॉलीवूडमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. इरफानने 1988 मध्ये ‘सलाम बॉम्बे’या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या इरफानचे कर्करोगाशी सामना करत 29 एप्रिल 2020 ला निधन झाले. इरफानने त्याच्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

तलवार

- Advertisement -

2008 मधील नोएडामध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडावर आधारित ‘तलवार’ या चित्रपटाने देशभरातील प्रेक्षकांना थक्क करुन टाकले. या चित्रपटात इरफानने CID अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

मकबूल

- Advertisement -

शेक्सपियरच्या मॅकबेथवर आधारित ‘मकबूल’ सिनेमात इरफान खानने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटामुळे इरफानला अनेक पुरस्कार मिळाले.

हैदर

हा चित्रपट रहस्यमय असून,यात इरफानने ‘रुहदार’नावाच्या माणसाची भूमिका साकारली आहे. हा माणसाच्या मनात अनेक सूडाच्या भावना आहेत.

पान सिंग तोमर

2011 मधील ‘पान सिंग तोमर’ या सिनेमात इरफानने एका क्रीडा नायकाची भूमिका साकारली आहे. त्याने अशी एका क्रिडा नायकाची भूमिका साकारली आहे, ज्याने स्वत:ची डाकूंची टोळी तयार केली आहे.

लाईफ ऑफ पाय

लाईफ ऑफ पाय या सिनेमात इरफान खानने एक संवेदनशीलतेने भूमिका साकारली. 2012 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट इरफानचा जागतिक पातळीवरील प्रसिद्ध सिनेमा आहे.

इरफानसोबत घालवले पत्नीने असे शेवटचे क्षण …

सुतापा सिकदार यांनी अलीकडेच एका मुलाखतीच्यावेळी त्यांनी इरफानच्या शेवटच्या क्षणांबद्दल सांगितले. त्याने सांगितले की इरफानने त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री एक गाणे गायले होते. त्याचबरोबर सुतापा यांनी कोणती गाणी ऐकली याचाही उल्लेख त्यांनी केला. सुतापाने मुलाखतीत सांगितले की, ‘झुला किने डाला रे, उमराव जानचे गाणे ‘अम्रैया झुले मोरा सैयां लूं मैं बलियां’, ‘लग जा गले के फिर ये हसीन रात हो ना हो’, ‘आज जाने की जिद ना करो’… ‘ आणि रवींद्र संगीत. तो बेशुद्ध होता पण त्याच्या अश्रू वाहत होते.


हे ही वाचा – RRR सिनेमा रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात ; तेलंगणा उच्च न्यायालयात याचिका दाखल


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -