घरताज्या घडामोडीअभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये उपचार सुरु

अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली, आयसीयूमध्ये उपचार सुरु

Subscribe

बॉलिवूड अभिनेता इरफान खानची प्रकृती बिघडली असून सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

बॉलिवूड अभिनेता इरफान खानची सध्या कॅन्सरशी झुंज सुरु असून त्याच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु आहेत. मात्र, आज अचानक त्याची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला तात्काळ मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याने सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

इरफान खानला न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर झाला असून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, लॉकडाऊनमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे त्याच्या या नियमित उपचारांमध्ये अडथळा निर्माण होत होता. त्यामुळेच त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

असे घेतले आईचे अंतिम दर्शन

दरम्यान, इरफान खानची आई सईदा बेगम यांचे नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून त्या आजारी होत्या. सईदा बेगम यांचे जयपूरमध्ये निधन झाले, मात्र लॉकडाऊनमुळे इरफान मुंबईत अडकला होता. कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने असहाय्य झालेल्या इरफानने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाणावलेल्या डोळ्यांनी आईला अखेरचा निरोप दिला.

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी झाला कॅन्सर

मार्च २०१८ मध्ये इरफानला कॅन्सर झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याने स्वतः ही धक्कादायक बातमी दिली होती. त्याने ट्विट करत म्हटले होते, “आयुष्यात अचानक काही अशा घटना होतात ज्यामुळे आयुष्य तुम्हाला खूप पुढे घेऊन जाते. माझ्या आयुष्यात मागील काही दिवसांपासून असेच काहीसे घडत आहे. मला न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर नावाचा आजार झाला आहे. मात्र, आजुबाजुच्या लोकांच्या प्रेमाने आणि शक्तीने मला नवी आशा मिळाली आहे.


हेही वाचा – मालेगावात दोन पोलीस कोरोनाबाधित; 12 नवे पॉझिटिव्ह


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -