Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन इरफान खानने केली होती ऑस्कर जिंकण्याची तयारी, घरात ट्रॉफी ठेवायची जागासुद्धा केली...

इरफान खानने केली होती ऑस्कर जिंकण्याची तयारी, घरात ट्रॉफी ठेवायची जागासुद्धा केली होती निश्चित

बेस्ट कर्मचा-यांच्या विश्रांतीगृहात १०००  पंखे व २०० कुलर्स तातडीने उपलब्ध करुन सर्व कर्मचार्यांना दिलासा देण्यात यावा, असे निर्देश आशिष चेंबूरकर यांनी  पत्रातून दिले आहेत.

Related Story

- Advertisement -

फिल्मी दुनियेतला सर्वात मनाचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘ऑस्कर अवॉर्ड’ चित्रपटसृष्टीत काम करणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे ऑस्कर जिंकण्याचे स्वप्न असते. दिवंगत अभिनेता इरफान खानने सुद्धा ऑस्कर जिंकण्याची तयारी केली होती. इतकेच नाही तर घरामध्ये ऑस्करची ट्रॉफी कुठे ठेवणार यासाठी सुद्धा जागा निश्चित केली होती. २०१७ साली एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ऑस्कर जिंकण्याची इच्छा प्रकट केली होती. गेल्या वर्षी अभिनेता इरफान खानचं कर्करोगामुळे निधन झालं होते. हरहुन्नरी कलाकार गेल्यामुळे बॉलिवूड मध्येचं नाही तर सपूर्ण देशामध्ये शोककळा पसरली होती. आपल्या अभिनयामुळे त्यांनी लोकांच्या मनात जागा मिळवली तसेच इरफान यांनी हॉलिवूड चित्रपटांमध्येही देखील काम केलं होतं. नुकतच ९३ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. मनाच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता इरफान खान यांना आदरांजली वाहण्यात आली. एकेकाळी ऑस्कर जिंकण्याचे स्वप्न असलेल्या व्यक्तीला त्याच सोहळ्यात आदरांजली वाहताना पाहून अनेकांचे डोळे पानवले होते.

इरफान यांनी आपल्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला 1988 सालापासून ‘सलाम बॉम्बे; या चित्रपटातील एका छोट्याश्या रोलने केली होती. आणि या चित्रपटाला ऑस्कर साठी नामांकन मिळालं होतं  तसेच ‘स्लमडॉग मिलेनियर’ आणि ‘लाईफ ऑफ पाय’ चित्रपटांना ऑस्कर मधील विविध भागांमध्ये नॉमिनेशन मिळाली होती. आणि ऑस्करने सन्मानितदेखील करण्यात आलं होतं. इरफान खान यांच्या वाटेला आलेल्या चित्रपटातील कोणत्याही पत्रामध्ये पुर्णपणे गुंतून जात असे. म्हणून अनेक दिग्गज कलाकारांच्या यादीत त्याने आपलं स्थान पटकावल होतं. आज जरी इरफान खान जगामध्ये नाही तरीही अनेक चाहत्यांच्या हृदयात नेहमी असतील. आजही सोशल मीडियावर इरफानच्या आठवणीत चाहते अनेक पोस्ट व्हिडिओ शेअर करतांना दिसतात.


- Advertisement -

हे हि वाचा – 93 Oscar award 2021: ऑस्कर सोहळ्यात वेशभूषाकार भानू अथय्या आणि अभिनेता इरफान खानला वाहिली आदरांजली

- Advertisement -