घरट्रेंडिंग'एक गाडी में सवार दोनों सितारे,एक साथ सफर पर निकल पडे'

‘एक गाडी में सवार दोनों सितारे,एक साथ सफर पर निकल पडे’

Subscribe

ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी निखील आडवाणी दिग्दर्शित ‘डी-डे’ चित्रपटात काम केलं होतं.

हरहुन्नरी अभिनेता इरफान खानच्या निधनानंतर बॉलिवूड अद्याप सावरलंही नाही तोच बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी सकाळी ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आली आणि बॉलिवूडला यातून सावरणे कठीण झाले. ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा परसरली आहे. फक्त २४ तासात बॉलिवूडने दोन जबरदस्त अभिनेते गमावले आहेत. ही जागा कधीही भरून न निघाणारी आहे. इरफान खान आणि ऋषी कपूर यांचा एक फोटोही सध्या चर्चेत आहे. हा फोटो बघून बॉलिवूडचे झालेले नुकसानाची जाणीव होते.

काय आहे फोटोत

हा फोटो दोघांनी एकत्र काम केलेल्या चित्रपटातील आहे. दोघेही कारमध्ये मागच्या सीटवर बसलेले दिसत आहेत. इरफान खान आणि ऋषी कपूर सध्या एकाच प्रवासात असल्याचं जणू काही या फोटात दिसत असल्याचं चाहते म्हणत आहेत. ऋषी कपूर आणि इरफान खान हे दोघेही कँन्सर या रोगाने त्रस्त होते. या दोघांवरही लंडनमध्ये उपचार झाले होते. या दोघांचेही निधन साधारण काही तास अंतराने झाले. त्यामुळे हा फोटो बघून दोघेही एकाच प्रवासाला निघाले आहेत..असच काहीस वाटतं.

- Advertisement -

‘डी-डे’ चित्रपटात केली होती भुमिका

ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी निखील आडवाणी दिग्दर्शित ‘डी-डे’ चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात ऋषी कपूर यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमपासून प्रेरित भूमिका निभावली होती. तर इरफान खान चित्रपटात रॉ एजंट होते. या चित्रपटात अर्जून रामपाल, हुमा कुरेशी आणि श्रुती हसनदेखील प्रमुख भूमिकेत होते.

- Advertisement -

सिद्धार्थ चांदेकर म्हणतो…

मराठी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यानेही हा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “शांत प्रवास करा दोघंही. अगदी आरामात. आमची काळजी करू नका… आम्ही करू मॅनेज कसंतरी”.


हे ही वाचा – एक ‘मोकळंढाकळं ट्विट’ बंद झालं – राज ठाकरे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -